शिवसैनिकांचा हिंदु स्मशानभूमीत गॅस दाहिनी च्या सुरक्षेसाठी हातात काठ्या घेऊन खडा पहारा

महानगर शिवसेनेच्या सैनिकांनी सोमवारी हिंदू स्मशानभूमीच्या तीनही गॅस दाहिनीच्या सुरक्षेसाठी स्मशानभूमीत हातात काठ्या खडा पहारा दिला. भाजप व मनसेबरोबरच आता तिसर्या गॅस दाहिनीला विरोध करणार्यांना आता धडा शिकविण्याकरिता शिवसेनेने यावेळी खुले आव्हान दिले. उल्लेखनीय आहे की अलीकडेच भाजप आणि मनसेने तिसर्या गॅस दाहिनीची तोडफोड केली. त्यानंतर हिंदु स्मशानभूमीने दोन्ही गॅस दाहिनीतून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यावर बंदी घातली. त्यानंतर पालिका आयुक्त रोडे यांनी तिसर्या शवदाहिनीला परवानगी दिल्यानंतर शिवसेनेने विरोध करणार्या भाजपा आणि मनसेला आव्हान दिले.

कोरोना काळात गॅस दाहिनीच सुरक्षित
शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांनी सांगितले की, कोरोना काळात गॅस दाहिनीतून मृतदेहांना अग्निदाह सर्वात सुरक्षित आहे. यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होत नाही. म्हणूनच जनहितासाठी नेहमी पुढे असणार्या शिवसेनेने या गॅस दाहिनीच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. स्मशानभूमीसाठी तैनात असलेल्या शिवसैनिकांमध्ये    महानगरप्रमुख पराग गुडदे यांच्या नेतृत्वात आंदोलन  ,ज्ञानेश्वर धाने, डॉ.तायडे, पंजाबराव तायवाडे, विजय ठाकरे, सुनील राऊत, संजय शेटे, श्याम धाने, वैभव मोहोकर, राजगुरू हिंगमिरे, मयूर गव्हाणे, श्याम कथे, बाल्या चव्हाण, सुरेश चौधरी, बाल्या पीठे,  संजय कडू, सचिन ठाकरे, अक्षय चर्हाटे, आदित्य ठाकरे, विनोद मंडलकार, श्रीराम मारोडकर, राजू शर्मा, लक्ष्मी शर्मा, सुरेखा आठवले, आदींचा समावेश होता.
Previous Post Next Post
MahaClickNews