दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा - म.न.वि.से .विदर्भ अध्यक्ष भुषण फरतोडे यांच्या नेतृत्व निवेदन

अमरावती 
महाराष्ट्र सरकारने तसेच शिक्षण मंत्री यांनी काही महिन्या आधी दहावी व बारावीच्या परीक्षा या कोरोना महामारी मुळे ऑफलाइन होणार असे जाहीर केले होते. या निर्णयावर काही पालक तसेच विद्यार्थी यांनी निषेध व्यक्त केला होता कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना सर्व विद्यार्थी एका ठिकाणी येऊन परीक्षा कसे देतील हा एक प्रश्न सर्वांनी मनात उपस्थित होतात तसेच वर्षभर ऑनलाइन शिक्षण दिल्यावर परीक्षा ऑफलाईन घेणार हा पण प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाला होता. काही दिवसातच सरकार व प्रशासन यांना कळले की कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे व अशा परिस्थितीत परीक्षा घेणे कठीण होणार. महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकारच्या निर्णयास सोबत सर्व विद्यार्थी व पालक सकारात्मक आहे असे निदर्शनास येते महाराष्ट्रात तसेच जगभर असे प्रथमच घडत असावे, परंतू आजची परिस्थिती लक्षात घेता या कठोर निर्णयाबाबत आपले आभार. परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबींचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता. त्यामुळे आज विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
महोदय निर्णय योग्य जरी असला तरी कोरोणा च्या प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक संकट सर्वांसमोर उभा आहे.   परीक्षा रद्द झाली तर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल. या विषयात राज्य सरकार तसेच प्रशासनाने योग्य ते लक्ष देऊन विद्यार्थी व पालकांना योग्य निर्णय घ्यावा. आज अमरावती तसेच ग्रामीण भागात कित्येक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यात कोरोणा सारख्या महामारीत काहींच्या घरी इतके खराब परिस्थिती होती की दोन टाइमचे जेवण नसतानाही त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे योग्य समजले अशा सर्व विद्यार्थी व पालकांना आपण योग्य तो निर्णय घेऊन मदत करावी.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती जिल्हा आपणास विनंती करतो की हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा व परीक्षा शुल्क परत करावा. तसेच परीक्षा शुल्क परत करता येत नसेल तर आज अमरावती जिल्ह्यातील हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे काय होणार याचे तरी उत्तर पालकांना द्यावे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पश्‍चिम विदर्भ अध्यक्ष भूषण फरतोडे, जिल्हाध्यक्ष धिरज तायडे, शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, उपाध्यक्ष ऋतुज डायलकर, पवन लेंडे, मयत तांबुसकर, आदेश इंगळे, पवन बोंडे, अमन मडावी, सागर शानदार आदी उपस्थित होते
Previous Post Next Post
MahaClickNews