कुलगुरू चांदेकर यांच्या अनियमीत चुकांवर पांघरूण घालण्यासाठी दीक्षांत समारंभाचा वापर- सागर देशमुख

 
अमरावती 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने आयोजीत केलेल्या दिक्षांत समारंभात दिनांक २९ मे २०२१ रोजी आपण सहभागी होत असल्याचे वर्तमानपत्रातुन कळाले. मा. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कुलगुरू पदाचा कालवधी १ जुन २०२१ रोजी संपत असतांना केवळ २ दिवस आधी अशा दिक्षांत समारंभाचे COVID च्या वातारणामध्ये आयोजन करणे म्हणजे कुलपतीच्या उपस्थितीमध्ये प्रकरणावर पांघरूण घालणे होय.
            मा. डॉ. चांदेकर यांनी कुलगुरू म्हणुन संत गाडगेबाबा विद्यापिठाचा कारभार सांभाळल्यानंतर विद्यार्थी समुहाच्या स्वाभिमानाचे व विद्यार्थ्याच्या विकासाचे प्रश्न बाजुला सारून केवळ आणि केवळ मुठभर कंत्राटदारांच्या हिताचे विषय राबविले असुन विद्यार्थ्याच्या ज्वलंत प्रश्नांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले याची काही उदाहरणे मी आपल्याला देवु इच्छितो.
१.       Mindlogic Company ला परिक्षा विषयक कालाचा दिलेला ठेका हा परिक्षा विषयक कामाचा बोजवारा आहे. डॉ. ल.बी मराठे, के.एल.कुलकर्णी आणि भी.र. वाघमारे यांच्या समित्यांना या Mindlogic Company विरोधात शिफारसी व उपाययोजना दिलेल्या असतांना या कंपनीचे कंत्राट रदद करण्यास भरपुर विलंब केला. हा विलंब हेच दर्शवितो की, डॉ. चांदेकर यांना कंत्राटदाराचे हित महत्वाचे आहे ना की विद्यार्थ्यांचे.
२.      उन्हाळी २०२० परिक्षा ऑक्टोबर २०२० ते जाने २०२१ दरम्यान online पध्दतीने पार पडली ज्या Comark Company नागपुर हा ठेका देण्यात आला होता त्या कंपनीने स्वत:च्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमुद केले आहे की, अशा प्रकारच्या परिक्षा घेण्याचा अनुभव आम्हाला नाही. तरी डॉ. चांदेकर यांनी या कंत्राटदाचा कोणताही करार व्यवस्थापन समितीपुढे न आणता स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा कंत्राट Comark Company ला दिला व ५ लाख विद्यार्थ्याच्या भविष्याचा खेळखंडोबा केला.
३.      विद्यापिठ अनुदान आयोगाने विद्यापिठांना अटल कम्युनिटी अन्वेशन सेंटर स्थापित करण्यासाठी ८ कोटी रूपयाचे अनुदान जाहीर करून त्यासंदर्भात प्रस्ताव मा. कुलगुरू ना मागविले. या माध्यमातनु  शैक्षणिक विभाग व संलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे स्वयंरोजगाराचे प्रश्न हाताळणे सोपे जाणार होते. परंतु मा. कुलगुरूनी या संदर्भात कोणताही प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे न पाठवता लाखो विद्यार्थ्याचे नुकसान करण्याचे काम केले.
 
..२..
..२..
 
मा. कुलगुरू डॉ. चांदेकर अतिशय चालाख पध्दतीने आपल्या उपस्थितीत केलेला आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थ्याचे केलेले नुकसान या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी आपणांस नम्र विनंती करतो की, अशा या भ्रष्ट कुलगुरूच्या दिक्षांत समारंभाला आपण उपस्थित राहु नये.
मा. राज्यपाल महोदय आपणास या निवेदनाव्दारे इतकेच सुचवायचे आहे की, मा. कुलगुरूच्या अशा या आर्थिक गैरव्यवहारामुळे, अविश्वसनियतेमुळे, अधिका-यांच्या नेमणुकीतील गैरव्यवहारामुळे प्रसार माध्यमे, जनतेमध्ये अतिशय तीव्र चिड निर्माण झालेली आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा सर्वोत्तम मानला जातो परंतु मा. कुलगुरू महोदय आपल्याा स्वार्थासाठी भविष्याशी खेळत आहे त्यामुळे आपण अशा या भ्रष्ट कुलगुरुच्या दिक्षांत समारंभाला उपस्थित राहुन कुलगुरुंना अभय देत असाल तर हा विद्यार्थ्याचा फार मोठा अपमान ठरेल त्यामुळे मी आपणास परत नम्र विनंती करतो की, आपली गरिमामय उपस्थिती अशा विद्यार्थी हित न जोपासणा-या भ्रष्ट कुलगुरूच्या दिक्षांत समारंभाला लाभु नये.

 
 
Previous Post Next Post
MahaClickNews