मी जबाबदार_ नियमभंग करणा-यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात आजपासून विशेष मोहिम अमरावती शहरासाठी 20 पथके नियुक्त

_तिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. दुकाने मर्यादित वेळेत सुरु करण्यास परवानगी देताना नियम पाळले जावेत यासाठी। दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईची वेळच येता कामा नये. कोरोनापासून आपले व इतरांचे, तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती ओळखून सर्वांनी साथ नियंत्रणासाठी सहकार्य करावे_ पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


रोजगार व व्यवसाय ठप्प होऊ नयेत व जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी टाळेबंदीच्या निर्बंधात अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. दुर्देवाने या कालावधीत कोरोनाचे संक्रमण वाढले तर पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहून कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे - *जिल्हाधिकारी शैलेश नवाल


अमरावती, दि. 2 : संचारबंदीत काहीशी शिथीलता आणल्यानंतर साथ नियंत्रणासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. तसे नियम न पाळणा-या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकांद्वारे विशेष मोहिम उद्यापासून (3 जून) 6 जूनपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न वापरल्यास 750 रुपये दंड, तर दुकानांत विक्रेते- ग्राहक यात सोशल डिस्टन्स नसणे, 2 ग्राहकांत कमीत कमी 3 फूट अंतर न राखणे, अंतर राखण्यासाठी मार्किंग न करणे आदींसाठी 35 हजार दंड व दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, दुस-यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. कारवाई करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती व कार्यालय क्षेत्रात कार्यालयप्रमुखांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

 अमरावती शहरासाठी उपजिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखालील पथके

        विशेष मोहिमेत अमरावती शहर क्षेत्रासाठी तीन उपजिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली एकूण 20 पथके निर्माण करण्यात आली आहेत.
भाजीबाजार, कॉटन मार्केट, मोची गल्ली, कोर्ट रोड

        उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले हे नियंत्रण अधिकारी असलेल्या पथकांमध्ये, अमरावती शहरातील कोर्ट परिसराची जबाबदारी राज्यकर निरीक्षक आशिष तिवारी, स्वास्थ निरीक्षक सागर राजूरकर व एएसआय गजानन कवळे यांच्याकडे देण्यात आली आहे. गाडगेबाबा मंदिर रोडची जबाबदारी उपकार्यकारी अभियंता अनिल मोहाळे, स्वास्थ निरीक्षक श्री. माहूलकर, पोलीस कर्मचारी अमोल माहुलकर यांच्याकडे, भाजीबाजाराची जबाबदारी सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, आरोग्य निरीक्षक विकी जेधे, पोलीस कर्मचारी सागर कडू यांच्याकडे, तर मोची गल्ली परिसराची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, आरोग्य निरीक्षक आशिष सहारे, पोलीस कर्मचारी स्वप्नील पापळकर यांच्याकडे आहे. सहायक समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांच्या पथकात आरोग्य निरीक्षक इम्रान खान व पोलीस कर्मचारी रुपाली गणवीर यांचा समावेश असून, हे पथक कॉटन मार्केट परिसराची जबाबदारी सांभाळेल.

                                                *दस्तुरनगर, रुक्मिणीनगर, जवाहरगेट ते सराफा*

            उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्या नियंत्रणाखालील पथकांत, दस्तूरनगर परिसराची जबाबदारी कौशल्य विकास सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, आरोग्य निरीक्षक रोहित हडाळे, पोलीस कर्मचारी श्वेता गुळकरी, रुक्मिणीनगरची जबाबदारी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र गुठळे, आवेश शेख, संगीता आखरे यांच्याकडे, तर इतवारा बाजारासाठी जलसंधारण अधिकारी हेमंत निपाणे, परीक्षित गोरले, उमा चव्हाण यांचे पथक नियुक्त आहे. जवाहरगेट ते सराफा परिसरासाठी उद्योग निरीक्षक जी. बी. सांगळे, अनिकेत फुके, स्वाती बाजारे, तर गुलशन मार्केटसाठी भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, योगेश खंडाळे, प्रियंका जवळकर काम पाहतील. जवाहररोडसाठी सहायक नगररचना संचालक उमेश वाघाडे, भारत वाघामोडे, राजू काळे यांचे, तर रवीनगरसाठी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, सचिन गोहर, अंबादास मोहोड यांचे, गांधी चौकासाठी उद्योग निरीक्षक एन. एन. इंगळे, संजय बांबल, सुरेश वानखडे यांचे, मालटेकडीसाठी नगररचना अधिकारी श्रीकांत पेटकर, स्वप्नील रामसे, श्री. नारायण यांचे व नवाथे चौकासाठी पाटबंधारे उपअभियंता द. श. दारोडे, प्रशांत सरोदे, श्री. नंद किशोर यांचे पथक नियुक्त आहे.

जयस्तंभ, राजकमल, इर्विन, पंचवटी

अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत हे नियंत्रण अधिकारी असलेल्या पथकांत, जयस्तंभ चौकासाठी पाटबंधारे उपकार्यकारी अभियंता एन. एस. सावरकर, राजकुमार गोहर, श्री. विजय यांचे पथक नियुक्त आहे. राजकमल चौकासाठी राज्य कर निरीक्षक सागर मोटघरे, अमित धिमे, कैलास गुप्ता, इर्विन चौकासाठी विक्री कर निरीक्षक रितेश पिल्ले, गोपाळ यादव, राजीव नेमाणे यांचे, तर मालटेकडी परिसरासाठी एसटीआय राजेश राऊत, मनोज सारवान, पीयुष महल्ले व पंचवटी चौकासाठी एसटीआय मंगेश भोनखाडे, मोहम्मद नजीर, मुकेश परचाके यांचे पथक नियुक्त आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews