आशासेविका व आशा गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ व्हावी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अमरावती, दि. 10 :  कोरोना साथ नियंत्रणासाठी आघाडीवर राहून कार्यरत असणा-या आशासेविका व आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ता म्हणून आशासेविका व आशा गटप्रवर्तक या कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिवसरात्र झोकून काम करत आहेत. साथ नियंत्रणासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आशाताई व आशा गटप्रवर्तक यांचा सहभाग विविध साथीच्या रोगांच्या सर्वेक्षणापासून गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यापर्यंत आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत मानसिक आजारांचे सर्वेक्षण करण्यापासून ते विविध लसीकरणास मदत करणे अशी विविध प्रकारची 70 ते 75 कामे करत आहेत.

त्यामुळे आशासेविका व आशा गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेऊन, त्याबाबतचा लाभ त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडून शासनस्तरावर पाठपुरावा होत आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews