संजय गांधी निराधार समिती भातकुली ने रेकॉर्डब्रेक प्रकरणे काढली निकाली.

अमरावती

संजय गांधी निराधार समिती भातकुलीची काही दिवसांपूर्वी अध्यक्ष तथा सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या अनुषंघाने दि १५/०६/२०२१ रोजी नामदार यशोमतीताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार बैठक आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊजी मोहोड (मा. जिल्हापरिषद उपाध्यक्ष) होते. अध्यक्षस्थानी मूकद्दर खा पठाण (अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती तथा अध्यक्ष काँग्रेस कमेटी भातकुली).
बैठकीमध्ये इंदिरा गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, अपंग - दुर्धर आजार अर्थसहाय्य योजना यांची जवळपास ६०० एव्हडी रेकॉर्ड ब्रेक प्रकरणे निकाली काढण्यात आली.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अंकुश राजाभाऊ जुनघरे (उपाध्यक्ष युवक काँग्रेस तिवसा विधानसभा), आशुतोष देशमुख, रोशन झासकर, सरलाताई इंगळे, अमोल वरघडे, बबलू तायडे तसेच गुड्डूभाऊ कुचे, सोमेश्वर गावंडे, गजानन लांजेवार, अनिल बिरे, सागर जुनघरे, हर्षद गवळी, पी.पी. पळसकर (नायब तहसिलदार), ए. जी मावस्कर, पी.डी. जावरकर आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews