स्व. श्याम मठे स्मृती प्रित्यर्थ वृध्दाश्रमात जीवनाश्यक वस्तुंचे वितरण -फोटो, व्हिडीओग्राफर यांनी दिली अनोखी श्रध्दांजली

अमरावती, 
समर्पण स्टुडीओचे संचालक स्व. श्याम वसंतराव मठे (50 रा. रामनगर), यांचे अल्पशा आजाराने 31 मे रोजी निधन झाले. 1990 ते 2019 पर्यंत सक्रीय फोटोग्राफी व व्हिडीओ ग्राफी करुन त्यांनी अनेकांची मने जिंकली. मनमिळावू तसेच हसमुख स्वभावाचे श्याम मठे अनेक संस्थेचे पदाधिकारी व अमरावती शहरातील अमरावती फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर असोसिएशनचे ते संस्थापक पदाधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर तेराव्या कार्यक्रम न करता फोटो व विडीओग्राफरनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृध्दाश्रमात भोजनदान व जीवनाश्यक वस्तुचे वितरण करुन त्यांना अनोखी श्रध्दांजली दिली. 
यावेळी मठे परीवारातील सदस्य राम, मिना, आकांक्षा, अंकीता मठे, अश्विनी, अर्थव, अनुष्का, मठे, अशोकराव चिंचोळकर, अतुल चिंचोळकर, राजेंद्र मासोदकर, दिनेश मारोडकर, प्रकाश जोशी, वासंती जोशी, प्रदीप जोशी, संजय विंचुरकर, व मधुबन वृध्दाश्रमातील दत्तात्रय साऊरकर, धिरज चौधरी, चंद्रकांत टेंभुर्णे, चंद्रकांत सबनिस, प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर मंडळीपैकी मंगेश ठाकरे, उदय चाकोते, शशांक नागरे, मनिष जगताप, मोहन कोहळे, छाया काळमेघ, गजानन फणसे, अनंत जांगजोड, शशी ठवळी, नरेश बोधाणी, रामकृष्ण हिरुळकर, आकाश लादे, सागर राऊत, शेखर गौतम, अमोल काळमेघ, महेश सबनिस, करणभाऊ, मिलींद मेटकर, बबलु ढोले, रोशन खैरे, सुहास बैतुले, अनिल साखरकर, नरेश जिरापुरे, संतोष पवार, संजय नागरे, जगदीश पवार, वैभव दलाल, विवेक पवार, गुणवंत कोठारी, अनिल पडीया, चंदु लुल्ला, दिनेश शर्मा, विजु देवाणी, गजानन अंबाडकर, मंगेश घाटोळ उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews