उद्धवस्थ झालेल्या कुटूंबाला 'संकल्प'ची मदत

अमरावती

शहरातील बुधवार परिसरातील  लोहार मठाची मालकी असणाऱ्या सीताराम बिल्डिंग येथे 1930 पासून राहणाऱ्या एका कुटुंबाचे घर लोहार मठ  विश्वास्थानी उडवस्थ केले. उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला शहरातही संकल्प संस्थेने मदतीचा हात देऊन आधार दिला आहे.

लोहार मठ येथील इमारतीत काळे कुटुंब 1930 पासून भाड्याने राहत आहे. सुरुवातील 7 रुपये भाडे असणाऱ्या या घराचे आज 500 रुपये भाडे हे कुटुंब लोहार मठा ला देत होते. दरम्यान सोमवारी लोहार मठाचे  विश्वास्थ असणाऱ्या डॉक्टरांनी काळे कुटुंब राहत आलेले घर पाडून टाकले.  डोक्यावरचे छत अचानक असे निघून गेल्याने 75 वर्ष वयाचे सुधाकर काळे, त्यांच्या पत्नी रंगुबाई काळे, मुलगा प्रकाश काळे, महेश काळे, स्नुषा चेतना काळे, पूजा काळे, नातू आदेश काळे आणि नात श्रावणी काळे याना आता राहायचे कुठे असा प्रश्न पडला. 
काळे कुटुंबावर झालेल्या अन्यायाची माहिती मिळताच संकल्प सामाजिक संस्थेचे प्रमुख नितीन कदम काळे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले.  काळे कुटुंबियांना असे अचानक बेघर करणाऱ्या  लोहार मठाच्या विश्वास्थानविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. काळे कुटुंबियांना नवीन घर बांधून देण्याचा संकल्प यावेळी नितीन कदम यांनी केला.
Previous Post Next Post
MahaClickNews