मनपातर्फे कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये कोविड १९ लसिकरण

अमरावती प्रतिनिधी,
सध्‍या अमरावती शहरामध्‍ये कोविड-१९ लसिकरणाचे काम सुरु आहे. याचाच एक भाग म्‍हणून आज दिनांक १४ जुन,२०२१ रोजी अमरावती शहराच्‍या मध्‍यवर्ती असलेल्‍या अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये मनपाच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत मोबाईल व्‍हॅनद्वारे ४५ वर्षापेक्षा जास्‍त वयाच्‍या लाभार्थ्‍यांना कोविड १९ लस देण्‍यात आली. कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये दैनंदिन व्‍यवहारा करीता येणारे सामान्‍य नागरिक अडते व कृषी उत्‍पन्‍न समितीच्‍या समस्‍यांना या लसिकरणाचा लाभ देण्‍यात आला. मोबाईल व्‍हॅन चे उदघाटन मा.आमदार सौ.सुलभाताई खोडके व कार्यक्रमाचे अध्‍यक्ष महापौर चेतन गावंडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, एम.आय.डी.सी. असोसिएशन अध्‍यक्ष किरण पातुरकर, अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती  सभापती अशोक दहीकर, उपसभापती नानाभाऊ नागमोते, अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती संचालक प्रमोद इंगोले, अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती सचिव दिपक विजयकर, मनपा सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, डॉ.जयश्री नांदुरकर, डॉ.फिरोज खान उपस्थित होते.  
मनपा सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी या विषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, सदरच्‍या मोबाईल व्‍हॅनद्वारे असे आयोजन वेळोवेळी मनपाच्‍या आरोग्‍य विभागामार्फत करण्‍यात येतील. ज्‍या व्‍यवसायीक आस्‍थापनेच्‍या ठिकाणी ४५ वर्षापेक्षा जास्‍त वयाचे किमान १०० किंवा त्‍यापेक्षा जास्‍त कर्मचारी कार्यरत असतील अश्‍या आस्‍थापनांतील कर्मचा-यांकरीता या मोबाईल व्‍हॅनद्वारे कोविड १९ लसिकरण करण्‍याकरीता प्राप्‍त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सोय करता येईल.४५ वर्षापेक्षा जास्‍त वयाचे किमान १०० किंवा त्‍यापेक्षा जास्‍त कर्मचारी कार्यरत आस्‍थापनांनी कोविड १९ नियमाचे पालन करुन लसिकरण करण्‍याकरीता अश्‍या आस्‍थापनांनी मनपा सार्वजनिक आरोग्‍य विभागाशी संपर्क साधू शकतील असे मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews