डॉ मुरलीधर चांदेकर यांना केलेल्या भष्टाचाराची कबुली देण्यासाठीचे सद्बुद्धी मिळो यासाठी विद्यार्थ्यांची प्रार्थना

अमरावती 
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीने. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होम हवन आयोजन करून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या मुळे लागलेल्या ग्रहणातून मुक्त झाल्या बद्दल परमेश्वराचे आभार मानले. त्याचबरोबर गरजूंना धान्य व कपडे वाटप करण्यात आला.


गेल्या पाच वर्ष पासून माजी कलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यानी विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न जाणीव पूर्वक दुर्लक्षित करून सामान्य विद्यार्थ्याला नागविण्याचे,.फसविण्याचे काम केले होते.  विद्यापिठात जमा होणारा सामान्य विद्यार्थ्यांचा पैसा अपात्र कंपन्याच्या घश्यात ओतून विद्यापीठाचे मोठे आर्थिक नुकसान केले होते. विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती विषयक, ट्रेनिंग प्लेसमेंट विषयक, विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या विषयक, विकास विषयक बाबींना नख लावण्याचे काम डॉ मुरलीधर चांदेकर यानी केले होते .

यासर्व बाबींची चीड विद्यार्थी वर्गा मध्ये आहे. विद्यार्थी विरोधी व भ्रष्ट डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असलेला संताप आज अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रतीकात्मक रित्या होम हवन करून शुद्धीकरण करून व विद्यापीठाच्या विविध विभागात गोमूत्र शिंपडून संताप व्यक्त करण्यात आला.

या रचनात्मक व प्रतीकात्मक आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारातील संत गाडगे बाबांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांना त्यांनी केलेल्या भष्टाचारा ची कबुली देण्यासाठीचे बळ व सद्बुद्धी संत गाडगेबाबा नी द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली.

 येणाऱ्या काळ्यात जे नवीन कुलगुरु विद्यापीठाला लाभतील त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे व विद्यापीठातील अनेक पुढे आलेल्या भ्रष्टाचाराची शहानिशा करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी व विद्यार्थी वर्गावर झालेल्या अन्यायावर विद्यार्थांना न्याय मिळवून यासाठी संत गाडगेबाबांना व परमेश्वराला साकडे घातले. यावेळी प्रथमेश पिंपळे, अजिंक्य मेटकर, अखिल ठाकरे, तुषार कोंबे, भूषण कोलपकर, गोविंद यादव, अमन सोनी आदी विद्यार्थी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews