चिखलदऱ्याचा स्काय वॉक पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा- बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २७ : चिखलदरा स्काय वॉक पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानग्या आदी प्रक्रिया केंद्र शासनाकडून पूर्ण होणे आवश्यक आहे. ती पूर्ण व्हावी व स्काय वॉकचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा होत आहे, अशी माहिती पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज चिखलदरा येथे
दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज चिखलदरा येथील पोलीस विश्रामगृहाचा शुभारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

चिखलदरा स्काय वॉक हे या पर्यटन स्थळाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ते पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. केंद्र शासनाकडे पुढील प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी शासनाकडून सतत प्रयत्न होत आहेत. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन काम मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून दुकानांची वेळ कमी करणे आदी मर्यादा घालण्यात आली. त्याच अनुषंगाने गाविलगड आदी पर्यटन सुरू ठेवण्याचा निर्णय आवश्यक दक्षता आदी सर्व बाजू तपासून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews