मला सहन होत नाही : नितीन भाऊ कदम

 मला सहन होत नाही
संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे वर्षभर नवनवीन मानवहीतासंबंधी‌ उपक्रम राबविण्यात येतात. खूप नागरिक, गोरगरिब गरजू नागरिकांसोबत आमची भावनिक नाळ जुळते. आमच्या लोकहिताच्या संस्थेला उत्तम असा प्रतिसादही मिळतो.पण आज असा काही प्रकार घडला तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तरीही थोडक्यात या घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध करत आपल्या समोर अल्प स्वरूपात मांडू इच्छितो.
आपल्या अमरावती शहरामध्ये बुधवारा परिसरात लोहार मठाची मालकी असणाऱ्या सीताराम बिल्डिंग येथे 1930 पासून म्हणजेच 90 वर्षापासून एका कुटुंबाचे घर लोहार मठ विष्वस्थानी उध्वस्त केले. कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना किंवा सूचना न देता घर उध्वस्त करण्यात आले.
ही घटना आपणास वाचतांना आपल्याला सामान्य घटनेसारखी जरी वाटत असली तरी या घटनेचा माझ्या मनावर मोठया प्रमाणात परिणाम झाला.
      काही दिवसापूर्वी लॉक डाऊन 2.0.मध्ये गरजू लोकांना मदत करीत असताना काही छोटे मुले राजकमल चौकामध्ये दररोज आमच्या टीमची मोठ्या आतुरतेने वाट बघत असत. एक दिवस असाच मी त्यांच्या कडे जाऊन त्यांची विचारपूस केली. मला त्यांच्या गरिबीची जाणीव झाली असता मी त्यांना त्यांच्या शिक्षणास कुठेही अडचण आल्यास पूर्ण मदत करण्याची जवाबदारी स्वीकारून माझे कार्ड त्यांना दिले.व तेथून निरोप घेतला.
   लॉकडाऊन ला स्थगिती मिळाली.. दिवस निघत होते. अशातच माझ्या मोबाईल वर मला कॉल आला. त्यामध्ये 'साहेब आमचे घर पाडले' असा आरडाओरडा त्यामधून ऐकायला येत होता. मी घटनेची तात्पुरती माहिती घेऊन घटनास्थळी पोहोचलो असतांना मला घटनास्थळी पडीत अवस्थेत घर व त्यासमोर पीडित कुटुंब निदर्शनास आले. दरम्यान ती लहान मुले जी आमच्या मदतीच्या खाद्यपदार्थाची मोठ्या‌ आतुरतेने वाट बघणारी सोन्यासारखी लेकर धावत येऊन मला बिलगुन ढसाढसा रडू लागली. माझ्या परिचयाची नसणारी ती अनोडखी पीडित लोक केव्हा मला आपली वाटू लागली कडलच नाही. त्यानंतर मी त्यांचे सत्वन करुन घटनेची पूर्ण माहिती घेतली.त्यावेळी मला मिळालेल्या माहितीनुसार. लोहार मठ येथील इमारतीमध्ये काळे कुटुंबीय 1930 पासून भाडेतत्वावर वास्तव्यास राहत आले आहेत. सुरुवातीला 7 रुपये भाडे असणाऱ्या या घराचे आज 500 रुपये भाडे हे लोहार मठ ला देत होते. दरम्यान सोमवारी लोहार मठाचे विष्वस्थ असणाऱ्या डॉक्टरांनी काळे कुटुंब राहत असलेले घर पाडून टाकले . आधीच लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही व त्यामधे डोक्यावरचे छप्पर अचानक असे निघून गेल्यावर कुटुंबाची केवलवाणी अवस्था बघून झाली नाही. निवाऱ्याची अशी वेळेवर पावसाच्या दिवसामध्ये दुर्वावस्था झाल्यावर मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली. या कुटुंबात 75 वर्षाचे सुधाकर काळे, त्यांच्या पत्नी रंगुबाई काळे, मुलगा प्रकाश काळे, महेश काळे, स्नुषा चेतना काळे, पूजा काळे, नातू आदेश काळे, आणि नात श्रावणी काळे यांच्यासमोर आता निवाऱ्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे. आम्हाला काळे कुटुंबीयांची अन्यायाची बातमी कळताच संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे तेथील पाहणी करण्यात आली. काळे कुटुंबीयांना असे अचानक बेघर करणाऱ्या लोहार मठाच्या विष्वस्थाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. पण यावरच मी थांबणार नाही यापुढे जर कुठल्याही प्रकारचा अन्याय अश्या गोरगरिब नागरिकांवर केल्यास मी स्वतः त्या प्रकरणात हात घालायला कसलीच वाट बघणार नाही. अश्या अमानवीय वृत्तीचा जाहीर निषेध करुन माझ्या वयक्तिक खर्चातून काळे कुटुंबियांच्या पूर्ण घर बांधून देण्याचा निर्धार मी याठिकाणी केला आहे. अश्या प्रकारच्या घटना *मला सहन होत नाही* म्हणून यापुढे अश्या गोरगरीबांना कुणीही त्रास देऊ नका.. माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की अश्या वाईट वृत्तींना जागीच वाचा फोंडा.

                         आपलाच हितचिंतक
                                नितिन कदम
                                 अमरावती 
Previous Post Next Post
MahaClickNews