बार्टी चा स्तुत्य उपक्रम..वृक्षारोपण पंधरवाड्यात हरीतभूमी करण्याचा अकोला समतादूतांचा संकल्पसमतादूत प्रकल्पामार्फत पत्रकार बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण

रविंद्र इंगळे
अकोट: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी),पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण  दिनानिमित्य 'वृक्षारोपण पंधरवाडा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात दि.०५ जून ते २० जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमांतर्गत ११ जून रोजीअकोला जिल्हातील अकोट शहरात दर्यापूर रोड स्थित स्मशानभूमी येथे तालुक्यातील पत्रकार बांधव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी अकोट नगरपालिकेचे अध्यक्ष हरिनारायण माकोडे, डॉ.धर्मपाल चिंचोळकर, पत्रकार रामदास काळे, राहुल कुलट,पत्रकार विनोद सगणे, अक्षय पाटील, धीरज बेलसरे त्याचबरोबर शिवसेना अकोट मा.उपशहर प्रमुख विजय ढेपे,विकास वानखडे,नितीपाल चिंचोळकर,रवींद्र बागडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.बार्टीच्या या उपक्रमास तालुक्यातील पत्रकार विजय शिंदे,सारंग कराळे,हरिओम व्यास,निलेश पोटे,मुकुंद कोरडे,सोनू सावजी,स्वप्नील सरकटे,संतोष विणके,योगेश लबळे,गुरुदेव इसापुरे,देवानंद खिरपुरे,आकाश धुमाळे,लकी इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रम बार्टी चे अकोला जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्या मुख्य मार्गदर्शत आयोजित करण्यात आला होता.कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव त्यामध्ये प्राणवायूची जाणवत असलेली कमतरता तसेच वाढते प्रदूषण पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे.त्यामुळे संपूर्ण राज्यात समतादूतांमार्फत कडुलिंब,वड,पिंपळ,आंबा,चिंच इत्यादी मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात येत असून हे सर्व वृक्ष प्राणवायू व सावली देणारे आहेत.या पंधरवाड्यात जे समतादूत जास्तीत जास्त रोपे लावतील व त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करतील त्यांना जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर बार्टी तर्फे पारितोषिके दिली जाणार आहेत.या पूर्ण वृक्षारोपण पंधरवाड्यात महाराष्ट्रात एकूण ५० हजारापर्यंत झाडे लावण्याचा बार्टीचा मानस आहे.बार्टीचे समतादूत हे लोकसहभागातून राज्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी प्रत्येक व्यक्तीने किमान ०१ किंवा त्यापेक्षा जास्त वृक्ष लावावीत व त्याचे संगोपन करावे त्याबाबत बार्टीकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.आज अकोट येथील स्मशानभूमीत एकूण २० वृक्षांची लागवड पत्रकार बांधव व इतर मान्यवरांच्या हस्ते केली असून त्यापैकी ६ वृक्षांना आज प्लास्टिक नेट चे कुंपण लावले.समतादूतांमार्फत आतापर्यंत अकोला जिल्हात जवळपास ३०० वृक्षाचे रोपण लोकसहभागातून करण्यात आले आहे.दिनांक २० जून २०२१ पर्यंत समतादूतांमार्फत अकोला जिल्हात एकूण ५०० ते ७०० वृक्ष रोपण करण्याचा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांचा मानस आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews