नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने केले रद्द


खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं सांगत न्यायालयाने राणांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.अमरावती -खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं सांगत न्यायालयाने राणांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावतीने दाखल केली होती याचिका -2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनी अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावतीने त्यांचे स्वीय सचिव सुनील भालेराव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे आल्याचे म्हटले होते. 2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता मात्र त्यांच्या जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये मात्र या अवैध जात प्रमाणपत्राच्या आधारावरच नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या.उच्च न्यायालयाचा निर्णय -खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असून हे खोटे प्रमाणपत्र 6 आठवड्यात आमच्याकडे सादर करा, असे उच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे.पोट निवडणुकीचे संकेत -खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे आल्याचे सिद्ध झाल्याने आता नवनीत राणा यांची खासदारकी रद्द होणार असे बोलले जात आहे. त्यामुळे पोट निवडणूक घेण्यासाठी अडसूळ यांना वेगळी याचिका उच्च न्यायालयात दाखल करावी लागणार आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews