वड पुजायचा की जगवायचा

वड पुजायचा की जगवायचा
वटसावित्री चा वड म्हणतोय 
धाग्यादोर्यांनी छळ थांबवा माझा.
या निवांत बसा सावलीत 
घ्या ऑक्सीजन चा पाहूणचार माझा.
🌳🌳🌳🌳🌳
एकच नवरा जन्मोजन्मी 
हा कसला गं हट्ट तुझा.. 
धाग्यात धागे गुंतले सारे
नेमका कोण नवरा तुझा..
🌳🌳🌳🌳🌳
निरंकार उपवास तुझे 
त्याला जराही झळ नाही..
सारं सारं सोसावे तू 
अन् त्याला जराही कळ नाही..
🌳🌳🌳🌳🌳
सत्यवानाची सावित्री 
कुणी कधी पाहीली का??
अत्याचाराच्या यमाने तुझा 
कधी पाठलाग सोडला का?? 
🌳🌳🌳🌳🌳
वटसावित्री येईल नेमाने 
एक वड लावून बघ
एकदा तरी तू ज्योतीबाची 
खरी सावित्री होऊन बघ.
🌳🌳🌳🌳🌳
 *शब्दांकन् क्षिप्रा मानकर* 
प्रदेश प्रसिद्धी प्रमुख
महाराष्ट्र  जिजाऊ ब्रिगेड
Previous Post Next Post
MahaClickNews