गावागावांतील चौकांचे होणार सौंदर्यीकरण_अचलपूरमध्ये राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून उपक्रम

चांदुर बाजार, ता ८ : शहरांप्रमाणे गावातील चौक देखील चांगले झाल्यास गावे खुलून दिसू शकतात. त्यामुळे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून अचलपूरमधील प्रत्येक गावातील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

 शिवराज्याभिषेक दिनापासून ही नवीन संकल्पना राबविण्यात येत  आहे. अचलपूर मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायत जिल्हापरिषद सर्कल मधील गाव तथा नगर पालिका क्षेत्रातील चौका-चौकात सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. 
तळेगाव मोहना ग्रामपंचायत समोरील चौक सौंदर्यीकरण करण्याकरिता श्री. कडू यांनी पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामांचे नियोजन व आराखडा करण्याचे निर्देश दिले. 

यावेळी बाळासाहेब भुजबळ, मनीष शेकोकर, मोहन काळे, अनुप भुजबळ व इतर गावकरी व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews