वणी ममदापूर येथील ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती
तिवसा तालुक्यातील वनी ममदापूर ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. वनी ममदापूर येथील 9 लक्ष रुपयाच्या तांडा वस्तीच्या रस्ता बांधकामाचे पालकमंत्र्यांचे हस्ते भुमिपूजन, ग्राम पंचायतच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे सुध्दा लोकापर्ण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. गावात रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पांदण रस्ते आदी नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews