पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन

अमरावती-  पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात  युवक काँग्रेसच्या वतीने हस्ताक्षर अभियान राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी या मागणीसाठी  आंदोलन सुरू करण्यात आले आहे.अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यात 2 लाख हस्ताक्षर घेऊन अभियान राबवले जात असून हस्ताक्षरांचे निवेदन करून केंद्र सरकार विरोधात राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार आहे .यापूर्वीही युवक काँग्रेसने विविध आंदोलने केली असून सरकारने भाववाढ कमी करावी अशी जोरदार आग्रही मागणी केली आहे पेट्रोल पंपासमोर हे अभियान घेण्यात येत आहे. यादरम्यान युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या.... माननीय नरेंद्र मोदी साहेब सत्तेत येण्याआधी प्रचारादरम्यान व पक्षाच्या अजेंड्या मध्ये असे स्पष्ट पणे नमूद करून जाहीर सभेत म्हणायचे की तुम्ही आम्हाला सत्तेत आणले तर आम्ही तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू, काळाधन वापस आणू, पेट्रोल डिझेलचे दर कमी करू, जनतेने विश्वास ठेवुन नरेंद्र मोदी साहेबाना सत्तेत आणले परंतु निवडून येताच क्षणी मोदी साहेबांनी नोटबंदी, अनियोजन पूर्वक GST आणि आता पेट्रोल डिझेलचे अव्वाच्या सव्वा भाव वाढवून सर्वसामान्य जनतेच्या हातात लॉलीपॉप देण्याच काम माननीय मोदी साहेबांनी केलं आहे मोदी साहेब इतक्या वरच थांबले नाही तर घरातील सिलेंडरची सुद्धा भाववाढ करून आमच्या माता भगिनींच्या हाती सुद्धा लॉलीपॉप देण्याची किमया माननीय मोदी साहेबांनी केली आहे मार्केटिंग किंग असणार्‍या मोदी साहेबांनी नोटबंदीच्या काळात स्वतःच्या आईला बॅंकेच्या लाइनमध्ये लावुन नोटा बदलायला लावुन त्याच सुद्धा मार्केटिंग केलं परंतु आता पेट्रोल पंपावर मोदी साहेबांच्या बँनर कडे पाहून हवालदिल मनाने पेट्रोल भरणार्‍या लोकांची लाइन मात्र त्यांना अजून दिसली नाही कच्चा तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर निच्चांक गाठला असून सुद्धा भारतात मात्र दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या भावात उच्चांक नरेंद्र मोदी साहेब गाठत आहे  याचाच निषेध म्हणुन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे  सन्मानीय अध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय बांते, योगेश बुंदिले, आशिष यादव, कृष्णा देशमुख यांच्या नेतृत्वात, पंकजभाऊ मोरे, सागरभाऊ यादव, सागरभाऊ कलाने, निलेशभाऊ गुहे, नितीन ठाकरे तन्मय मोहोळ पराग देशमुख चिन्मय तायडे अभिनव देशमुख अंकुश ठाकरे 
सागर बानूबाकोडे मुकेश लालवानी निलेश जाणारे, सुरज इंगळे प्रज्योत देशमुख, ऋषिकेश ठाकरे, तेजस दांडगे, अभिषेक हेडाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत नवाथे पेट्रोल पंप समोर पेट्रोल डिझेल दरवाढीच्या संदर्भात हस्ताक्षर लोलीपॉप वाटप अभियान  करण्यात आले
Previous Post Next Post
MahaClickNews