अमरावती
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलदरा या पर्यटन स्थळावर शनिवार व रविवार पर्यटनाला बंदी केली आहे; असे असताना पर्यटक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून विकेंड मध्ये मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्यात दाखल होत आहे. हा प्रकार कोरोना च्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिल्याप्रमाणे आहे. जोपर्यंत प्रशासन कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत पर्यटकांना व कोरोना संक्रमणाला आळा घालणे शक्य होणार नाही.