आयआयएमसी द्वारे सत्र २०१९-२० चे पुरस्कार जाहीर अमरावती केंद्रातून चैताली माहोरे, गौरी चंद्रा विजेते

अमरावती , २८ जुलै:
भारतीय जन संचार  संस्थेच्या अमरावती स्थित क्षेत्रीय केंद्रामधून चालविल्या जाणाऱ्या मराठी पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सत्र २०१९-२० मधून चैताली माहोरे , तर इंग्रजी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातुन गौरी चंद्रा या विध्यार्थिनिंनी प्रथम स्थान प्राप्त करीत प्रत्येकी रु. 5000 चा पुरस्कार पटकाविला आहे.

आयआयएमसीच्या सक्षम प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार कोविड विषाणू मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक वर्ष 2019-20 चा दीक्षांत समारंभ आयोजित केला जाणार नसल्याने पदविका प्रमाणपत्र आणि पुरस्कार स्पीड पोस्टद्वारे विध्यार्थ्यांच्या निवासस्थानी पाठविले जाणार आहे . 

भारतीय जनसंचार संस्थाना तर्फे  इंग्रजी , हिंदी सह उर्दू, मराठी, मल्याळम, ओडिया भाषेत पत्रकारितेचा पदविका तसेच रेडियो व टेलिव्हिजन आणि जाहिरात व जनसंपर्क विषयाचा स्वतंत्र एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येतो . अमरावती केंद्रात  इंग्रजी आणि मराठी अभ्यासक्रम उपलब्ध आहे .  
सर्व अभ्यासक्रमांमधून गुणानुक्रमे प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांना संस्थेतर्फे प्रत्येकी ५००० रुपये रोख  पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 

 अमरावती केंद्राचे संचालक डॉ अनिल सौमित्र यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून कौतुक केले . भविष्यात अमरावती केंद्रात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट  व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे केंद्र निर्माण होणार असून पत्रकारिता व जनसंवाद क्षेत्रातील करियरच्या संधी निर्माण करण्यास संस्थान प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  
प्रा विनय सोनुले, प्रा  अनिल जाधव व प्रा संध्या झा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post
MahaClickNews