जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश

अमरावती, दि. ११ : दर्यापूर, भातकुली आदी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून, त्याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश  महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

दर्यापूर तालुक्यात येवदा व भातकुली, तसेच इतर काही परिसरात अतिवृष्टी झाल्याने पीकनुकसान व इतर हानी झाली आहे. त्यामुळे या परिसरात सविस्तर व परिपूर्ण पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

*प्रत्येक बाबीची नोंद घ्या*
पंचनामे अत्यंत दक्षतापूर्वक व तपशीलवार करावेत. प्रत्येक अतिवृष्टीबाधिताला न्याय मिळणे आवश्यक आहे. कोरोना संकटकाळात शेती क्षेत्राचे नुकसान झाले. त्यात या परिसरात अतिवृष्टीचे संकट उदभवले. शेतकरी बांधवांना परिपूर्ण नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. 
महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

पंचनामे करताना शेतकरी बांधवांशी संवाद साधून परिपूर्ण माहिती घ्यावी व सर्व क्षेत्राची पाहणी करावी. शेतकरी बांधवांना  न्याय मिळवून देण्यासाठी पंचनामे अचूक व सविस्तर करावेत. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. एकही अतिवृष्टीबाधित शेतकरी बांधव भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews