पंढरपूर पायी दिंडीक-यांचे भावपूर्ण स्वागत

आकोट :प्रतिनिधी 
गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांची पायदळ दिंडी परंपरा कायम ठेवून श्रद्धासागर ते पंढरपूर पायदळ वारीवरुन परतलेल्या वारक-यांचे श्रद्धासागर येथे भावपूर्ण स्वागत पार पडले.

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा दरवर्षी गुरुमाऊली पालखी सोहळा पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात येते.यावर्षी  १५ वारक-यांनी आकोट ते  पंढरपूर पायदळ वारी पुर्ण केली. पंढरपूर निवासी संस्थेच्या धर्यामशाळेत विधिवत गुरू श्रींच्या पादुकांची स्थापना  व तिर्थस्थापना करुन  अखंड हरिनाम सप्ताह ,गुरुमाऊली पुण्यतिथी सोहळ्या अंतर्गत ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन किर्तनादी कार्यक्रम पार पडले.आषाढी वारी पुर्ण करुन परतलेल्या या वारक-यांचा  श्रद्धासागर क्षेत्री सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले होते.याप्रसंगी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे व ज्ञानेश प्रसाद पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

दरम्यान गुरुवर्य वासुदेव महाराजांचे निवासस्थानी श्री पादुकांचे पुजन व आरती ह.भ.भ.माधवराव मोहोकार ,पुरुषोत्तम मोहोकार यांनी केले.श्री निवासस्थान ते श्रद्धासागर  मार्गाने टाळमृदंगाचे स्वरात अभंग गात,"ॐ नमो वासुदेवा" च्या गजरात दिंडी सोहळा पार पडला. संत वासुदेव नगर, नरसिंग मंदीर,यात्रा चौक,नंदीपेठ मार्गावर ठिकठीकानी या दिंडीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.श्रद्धासागर येथे स्वागत सोहळा पार पडला.पंढरपूर  पायदळ दिंडीत सहभागी  अंबादास महाराज,महादेवराव ठाकरे,श्रीराम  कोरडे, उमेश मोहोकार,किसनराव जोध,श्रीकृष्ण काळे,नागोराव बायस्कार,प्रभाकरराव डोबाळे,बाळकृष्ण वाकोडे,साहेबराव वाघ,विपुल मोहोकार,भाष्करराव म्हसाये,महादेवराव बिहाडे,विलास गीते,मदन मोहोकार आदी  वारक-यांचा संस्थाध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले व विश्वस्थांचे  हस्ते  गौरव करण्यात आला. या दिंडी सोहळ्याने श्रद्धासागर भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले होते.

*या सोहळ्यात श्री विठ्ठल रुख्ख्मिणी संस्थान कौडण्यपूर चे विश्वस्त सुरेशराव चव्हाण,अशोकराव पवार,विजयराव डहाके,व्यवस्थापक काळे साहेब सहभागी झाले होते त्यांचाही शाल श्रीफळ देवून संस्थेद्वारा सत्कार करण्यात आला कौडण्यपूर निवासी आई रुख्ख्मिणीदेवीच्या समवेत  यावर्षी गुरुमाऊलींच्या पादुकांची ऐतिहासिक  वारी पुर्ण झाली. यावेळी कौडण्यपूर  संस्थानचे सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव रवी वानखडे,सहसचिव मोहन जायले पाटील,अवि गावंडे ,विश्वस्त सदाशिवराव पोटे,अशोकराव पाचडे,नंदकिशोर हिंगणकर ,कानुसेठ राठी तथा नगरसेवक मंगेश चिखले,संदेश रोडे,प्रा. साहेबराव मंगळे,डाॕ सुहास कुलट,अतुल कोरपे,सुधाकरराव हिंगणकर ,प्रदिप हिंगणकर यांचेसह  भक्तगण उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews