अथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

अकोट : अथर्व फाउंडेशन अकोला-अकोट च्या वतीने स्थानिक अंजनगाव मार्गावरील स्मशानभूमीत  २८ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडे लावा-झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. 
 पर्यावरणातील ढासळता समतोल पाहता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा असल्याने वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे अथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, संगोपन व संवर्धनाचा उपक्रम  राबविण्यात आला. या प्रसंगी पिंपळ, करंज, निंब आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली. अथर्व फाऊंडेशनचे योगेश वाकोडे यांनी वृक्ष व त्यांचे महत्व या विषयी विचार मांडले. पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. यावेळी योगेश वाकोडे, संजय रेळे, इंजि.विश्वास कुरवाडे, पत्रकार लकी इंगळे, सर्पमित्र मंगेश दवंडे,  गिर्यारोहक धीरज कळसाईत, सर्पमित्र योगेश दवंडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाठे, मनिष पंतिगे आदींनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपणासाठी राजकुमार दांडगे, विलास रजाने यांनी परिश्रम केले.  सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल  संतोष कुरोडे, महादेव गोडमाले, शारिक पटेल   यांनी रोप उपलब्ध करून दिले. 
*चिमुकल्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश*
अथर्व फाऊंडेशन च्या या उपक्रमात परिसरातील चिमुकल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी स्वराज वानखडे आदित्य वानखडे , दीपक दवंडे, ओम लबडे, शाम दवंडे आदींसह चिमुकल्यांनी सुध्दा वृक्षारोपण केले. या माध्यमातून वृक्षारोपण व संगोपनाचा संदेश चिमुकल्यांनी दिला.
Previous Post Next Post
MahaClickNews