आदर्श शिक्षक संदीप घाटे हे शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित.शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव

अमरावती :प्रतिनिधी 
शब्दगंध समुह प्रकाशन औरंगाबाद तर्फे  मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे  भव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती , कर्मचारी यांच्या कडून पुरस्कार करिता प्रस्ताव बोलावण्यात आले होते. प्राप्त अनेक प्रस्तावातून काही निवडक व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले . 
अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  बोरखडी (बु.)  पंचायत समिती भातकुली मधील शिक्षक   संदिप सुभाषराव घाटे यांना  शिक्षक गौरव  पुरस्काराने सन्माननिय करण्यात आले.

श्री. संदिप घाटे यांनी केल्याल्या उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबद्दल आधीच त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews