सागर देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या राज्याच्या क्रिडा विभागाच्या मुख्य समन्वयक पदी निवड

अमरावती :प्रतिनिधी 
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सन्माननीय सागर देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस क्रिडा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक पदी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सत्यजित दाद तांबे यांनी नुकतीच नेमणूक केली आहे सागर देशमुख हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव असून त्यांनी या आधी वेगवेगळ्या जिल्हय़ाचे युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणुन काम पाहिलेले आहे corona परिस्थिती मध्ये त्यांनी दररोज 100 लोकांची मोफत जेवण्याची व्यवस्था केली होती आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वात त्यांनी वेगवेगळ्या समस्याना घेऊन जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलने केली आहेत तसेच स्थानिक समस्यांना घेऊन सुद्धा त्यांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केली आहेत ते नेहमी युवकांच्या समस्यांना घेऊन अग्रेसिव्ह पणे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये क्रिडा विषयक समस्या असेल, स्पर्धा परीक्षा विषयक समस्या असेल किंवा सांस्कृतिक समस्या असेल त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते नेहमीच समोर असतात त्यांचीच निष्पत्ती म्हणुन त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्याच्या मुख्य क्रिडा समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सत्यजित दादा तांबे, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री व महिला व बालकल्याण मंत्री सन्माननीय यशोमती ताई ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे क्रिडामंत्री आदरणीय सुनील केदार, ईत्यादिंचे त्यानिमित्त त्यांनी आभार व्यक्त केले आहे
Previous Post Next Post
MahaClickNews