पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांची गोरक्षण संस्थेला भेट संस्थेला आवश्यक मदत मिळवून देऊ पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १७ : गौरक्षण संस्थेचे कार्य व विविध उपक्रमांसाठी आवश्यक ती सर्व मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही 
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

गोरक्षण संस्थेच्या उपक्रमांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आज संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. बी. अटल, दीपक मंत्री, ओमप्रकाश लढ्ढा, रामस्वरूप हेडा, श्यामसुंदर भय्याजी, हरिभाऊ मोहोड, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गोरक्षण संस्थेचा परिसर, गोशाळा व सर्व उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या विश्वस्तांशी चर्चा करून संस्थेच्या कामांची माहिती घेतली.
 
विश्वस्तांनी मांडलेल्या मागण्यांनुसार संस्थेच्या कार्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देऊ अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी  यावेळी दिली.
Previous Post Next Post
MahaClickNews