इंधन दरवाढीचा निषेध; अमरावतीत काँग्रेसचा सायकल मोर्चा

अमरावती - केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने अमरावतीत सायकल मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयासमोरून निघालेला हा सायकल मोर्चा विभागीय आयुक्तलयावर धडकला.

पालकमंत्री यशोमती ठाकूर सायकलवर स्वार -

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने काढलेल्या सायकल मोर्चात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकरे या सायकलवर स्वार होऊन सहभागी झाल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जिल्यात  पेट्रोल 105 रुपये लिटर -अमरावती जिल्ह्यात पेट्रोलची किंमत 105 रुपये लिटर इतकी आहे. 2014 मध्ये केवळ 55 रुपये लिटर या दराने पेट्रोल मिळत होते. मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून पेट्रोल, सिलेंडरचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले.पोलिसांसोबत बाचाबाची -विभागीय आयुक्तालयावर काँग्रेसचा सायकल मोर्चा धडकला तेव्हा पोलिसांनी सायकळवर स्वार यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, बळवंत वानखडे यांच्यासह आणखी पाच-ते सहा सायकलस्वार कार्यकर्त्यांना विभागीय आयुक्तलयाच्या आवारात प्रवेश दिला. जिल्हा परिषद सभापती बळवंत वानखडे यांना पोलिसांनी विभागीय आयुक्तलयाच्या प्रवेशद्वारावरच थांबवले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांच्यात बाचाबाची झाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता.

Previous Post Next Post
MahaClickNews