2 टक्क्यावरुन एक टक्क्यावर आले व्याजदर-अंबानगरी फोटो, व्हिडीओग्राफर पुरुष बचत गटाची आमसभा

अमरावती, प्रतिनिधी 
नुकतीच अंबानगरी फोटो - व्हिडिओ ग्राफर पुरूष बचत गटाची आमसभा घेण्यात आली या सभेत बचत गटाच्या सदस्य यांना देण्यात येणार्या कर्ज याच्यावर आधी व्याज दर आधी 2 टक्के होता जो आता एक टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे बचत गटाच्या सदस्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
आमसभेत बचत गटामार्फत उद्योग सुरू करणे, शासकीय काम घेण्यासाठी चर्चा बँकेतील शिल्लक रक्कम फिक्स डिपाँझीट करणे बचत गटाच्या कार्यलयासाठी जागेसाठी प्रयत्न करणे, बचतगटामार्फत उद्योग उभारण्यासाठी व फोटोग्राफर यांच्या हितासाठी पर्यंत्न करणे अशा अनेक विषय सर्वानुमते पारीत करण्यात आले. बचतगटामार्फत अनेक गरजुंना वेळीच कर्ज वाटप करण्यात येते. प्लॉट,घर, दुकान,कॅमेरा अशा विविध कामाकरिता आतापर्यंत चार लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे. सोबतच पाच लाख रुपयांची रक्कम बँकेत शिल्लक आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष निलश्याम चौधरी, सचिव मनीष जगताप, कोषाध्यक्ष प्रशांत टाके ,उपाध्यक्ष राजेश वाडेकर तर सदस्यांमध्ये राहुल पवार, राहुल पालेकर, गजानन अंबाडकर ,श्याम गादगे ,नितेश झा,अनिल साखरकर,प्रविन काळे,सचिन देशमुख, अनिल पडिया, संदिप पाटील, अंकुश राऊत,भुषन रडके,रितेश हातागडे,संदिप नाईक,प्रतिक रोहनकर, निखील तिवारी ,प्रशांत टाके,निलश्याम चौधरी, राजेश वाडेकर, मनीष जगताप, शशांक नागरे ,वैभव दलाल ,महेंद्र मोहड आमसभेला उपस्थित होते. हॉटेल लँडमार्क संचालक नितीन कदम यांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.
Previous Post Next Post
MahaClickNews