शालेय साहीत्याचे वाटप करुन साजरी केली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीअकोट रोटरीचा उपक्रम

अकोट: प्रतिनिधी 
स्थानिक् शनीवार पुरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांची जयंती अकोट रोटरीच्या वतीने शालेय साहीत्याचे वाटप करुन साजरी करण्यात आली.   सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयास अकोटचे तहसीलदार मडके, नायब तहसीलदार हरीष गुरव, दिलीप बोचे ,रोटरीचे अध्यक्ष संजय बोरोडे, सचिव माधव काळे , तथा रोटरीचे  माजी अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार , राजकुमार गांधी, उध्दवराव गणगणे यांनी सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांच्या पुतळयाचे पुजन तथा हारअर्पण करुन विनम्र अभीवादन करण्यात आले. त्यांनतर तेथील गरजवंत विद्यार्थ्यांना उपस्थीत पाहुण्यांच्या हस्ते शालेय पुस्तक ,वह्या व पेनाचे  वाटप करण्यात आले. यावेळी शनीवार पुरा येथील नागरीक व उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता राहुल तायडे, अवीनाश जाधव ,मिलींद गवई , गौरव जाधव, सागर थोरात, बाळासाहेब गवई, मधुकर जाधव, कैलाश वानखडे, अशोक सावळे, प्रवीन तायडे,  प्रयत्न केले. अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधीकारी कल्पेश गुलाहे यांनी दिली.
Previous Post Next Post
MahaClickNews