इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर

अमरावती : प्रतिनिधी 
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावती राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजीला भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले. त्या रक्तदान शिबिराला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. लीना कांडलकर तसेच प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. रागिणीताई देशमुख, कार्यकारिणी सदस्या, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती उपस्थित होत्या. सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथील डॉक्टर व त्यांची चमू यांचे सहकार्य लाभले.
शिबिराला भरघोस प्रतिसाद लाभला. १०१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. श्री प्रदीप अंधारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अमरावती (M.S.E.B.) व श्री. नवनीत सावरकर, सहाय्यक अभियंता यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली.
डॉ. अविनाश उखडे, रक्त संक्रमण अधिकारी, श्रीमती संगीता गायधने, श्रीमती शीतल पवार, कु. निकिता नागदिवे, कु. अश्विनी गायगोले, श्री. मंगेश उमप, श्री. कदम, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती, प्रा. डॉ. पुनम देशमुख, कार्यकारिणी सदस्या, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. सीमा अढाऊ, प्रा. डॉ. वंदना भोयर, प्रा. अनुप आत्राम, सल्लागार समिती, राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. मिलिंद इंगळे, डॉ. अंबाडेकर, प्रफुल्ल देशमुख, गजेश देशमुख, प्रशांत देशमुख, गणेश भारती, विजय सदांशिवे तसेच शालिनी आठवले, पपिहा शिंदे, राधिका बोराळे, सेजल ताटे, डीलेश्वरी नाईक, कल्याणी हाडोळे, दिव्या नवले, दीक्षा इंगळे इत्यादींनी या शिबिराच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
MahaClickNews