अमरावतीत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्या नेतृत्वात आंदोलन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली. यावेळी शिवसैनिकांनी राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. 


अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली. यावेळी शिवसैनिकांनी राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
अमरावती शिवसैनिकांकडून भाजप कार्यालयाबाहेर जाळपोळभाजप कार्यालयावर हल्ला शिवसेना महानगर प्रमुख   पराग गुढदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी राजापेठ परिसरातील भाजप कार्यालयावर सकळी 10.30 च्या सुमारास हल्ला केला. यावेळी भाजप आणि भाजप नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. कार्यालयावर असणाऱ्या पक्षाच्या नावावर काळी शाई फेकण्यात आली. तसंच कार्यालयाबाहेर असणारे फलक जाळण्यात आले. दगड आणि काठ्या मारून कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या.

राजापेठ कार्यालयात जमले भाजप कार्यकर्ते
भाजप कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. घटनेनंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयात पोचले. राजापेठ पोलीसही भाजप कार्यालयात पोहोचले. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने हल्ला करणाऱ्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत.हेही वाचा - नारायण राणेंच्या बेताल वक्तव्यावरून राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
Previous Post Next Post
MahaClickNews