सत्यपाल महाराज यांना "शौर्यरत्न पुरस्कार" प्रदान

रविंद्र इंगळे
अकोट: अकोट येथिल सप्तखंजेरी वादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना अकोला येथे शौर्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
जम्मू कश्मीर सीमा रेषेवर १९४७ ते १९४८ या कालावधीत भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपले शौर्य गाजविणाऱ्या प्रथम बटालियन महार मशिनगन रेजिमेंट चे १९४६ पासून कार्यरत शूर सैनिक स्मृतिशेष दौलतराव विठोबाजी जाधव यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त बहुजन विकास मंडळ अकोला या समाजसेवी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक ३१जुलै ला सम्यक संबोधी संस्था सभागृह रणपिसे नगर अकोला येथे राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरीचे जनक फुले - शाहू - आंबेडकर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या विचारांची गेली ५४ वर्षांपासून आपल्या किर्तनांच्या माध्यमातून समाजात पेरणी करणारे  सत्यपाल महाराज यांना "शौर्यरत्न पुरस्कार" २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह,शाल व रोख रक्कम दहा हजार रुपये आयोजकांच्या वतीने यावेळी सत्यपाल महाराजांना प्रदान करण्यात आले.यावेळी बहुजन विकास मंडळ संस्था अध्यक्ष भास्कर दौलतराव जाधव,सचिव अँड.मनीषा भास्करराव जाधव,कोषाध्यक्ष मनोहर ना.गिरी यांच्या सह सुगत वाघमारे, अँड.चंद्रकांत वानखडे,भारत वानखडे, अंबादास मानकर,प्रल्हाद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यासह इतर सत्कारमूर्ती कार्यक्रमात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मनोज जयस्वाल यांनी केले.
Previous Post Next Post
MahaClickNews