निष्काम कर्मयोगी वै. शिवशंकरभाऊंना श्रद्धांजली

आकोट:  प्रतिनिधी 
श्री गजानन महाराज संस्थान शेगांवचे व्यवस्थापकीय विश्वस्त निष्काम कर्मयोगी वै. शिवशंकर पाटील यांना वासुदेव भक्तांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे सामुहिक श्रद्धांजली कार्यक्रमात भाऊंच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम वै.शिवशंकर भाऊंच्या प्रतिमेचे पुजन व आरती पार पडली.श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले अध्यक्षस्थानी होते..
 *भाऊंचे कार्य प्रेरणा देत राहील*
निष्काम कर्मयोगी वै.शिवशंकर भाऊंच्या निधनाने आयुष्यभर निस्वार्थपणे सद्गुरुंची व त्यांच्या भक्तगणांची सेवा करणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेले आहे.संस्थानच्या विविध उपक्रमातील शिस्त,सेवा,स्वच्छता व नम्रता स्मरणात राहील अशी शोकाकुल भावना श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी व्यक्त करुन श्रद्धांजली वाहली.सामान्य भक्तगणांत देव शोधून त्यांची सेवा करणारा  महामानव आपल्यातून काळाने हिरावून नेला आहे.त्यांचे निधनाने गजानन भक्त पोरके झाल्यांची संवेदना प्राचार्य गजानन चोपडे यांनी यावेळी व्यक्त केली.देशात असंख्य  देवस्थाने धार्मिक संस्थांपुढे  प्रशासन,शिस्त व स्वच्छता व नम्रता व सेवेचा मोठा आदर्श भाऊंनी आदर्श निर्माण केले.ऐसा व्रतस्थ निष्काम कर्मयोगी पुन्हा होणे नाही अशी भावना माजी नगराध्यक्ष  पुरुषोत्तम चौखंडे यांनी व्यक्त केली.धार्मिक कार्या सोबतच  शैक्षणिक,आरोग्य व सामाजिक कार्यातील उच्चतम सेवा भाव अलौकिक आहे असे सांगून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड.गजानन पुंडकर यांनी भाऊंना विनम्र अभिवादन केले. वै.शिवशंकरभाऊंना साश्रूनयनाने सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी संस्थेचे सहसचिव मोहन पु. जायले पाटील,विश्वस्त डाॕ.अशोकराव बिहाडे,महादेवराव ठाकरे,अनिल कोरपे,नंदकिशोर हिंगणकर यांचेसह ह.भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील,अंबादास महाराज, डाॕ.अनघाताई सोनखासकर,प्रा.जया काळे,दिलिप काळे,भाऊराव बकाल,ललित बहाळे,अॕड.मनोज खंडारे,अनंत गावंडे,प्रा.शिरिष पोटे,माधवराव मोहोकार,प्रा.साहेबराव मंगळे,बाळासाहेब फोकमारे,सुरेश कराळे,जयकृष्ण वाकोडे,नागोराव वानखडे,,धनंजय वाघ,प्रा.गजानन हिंगणकर ,प्रा.पुरुषोत्तम जायले ,संस्थेचे व्यवस्थापक अमोल मानकर तथा वासुदेव भक्तगण,कर्मचारी,सेवेकरी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews