शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांना महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

संत गजानन महाराज यांचा सच्चा भक्त निघून गेला

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांना  महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली*

मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारं व्रतस्थ व्यक्तिमत्व हरपलं


अमरावती,  : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारे व्यक्तीमत्व, संत गजानन महाराजांचा एक सच्चा भक्त हरपला आहे, अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या कार्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

         श्रीमती ठाकूर आपल्या शोक संदेशात म्हणाल्या की, शेगाव संस्थानचे प्रमुख आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज सायंकाळी निधन झाल्याची अतिशय दुःखद  बातमी मिळाली. आदरणीय शिवशंकर भाऊंनी संत गजानन महाराजांचे कार्य जगभर पोहचविले. मागील अनेक वर्षांपासून संस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्रात व मध्यप्रदेश मध्ये महाराजांचे मंदिर उभारणीचे काम त्यांनी केले. संत गजानन महाराज यांना अपेक्षित असलेले गोर गरिबांचे कल्याण व सेवा करण्याचे काम भाऊंनी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे केले. असा हा  मानवसेवेला वाहून घेतलेला सेवेकरी निर्माण करणारे व्यक्तीमत्व, संत गजानन महाराजांचा एक सच्चा भक्त आज आपल्यामधून निघून गेला आहे, अशा शब्दात ऍड. यशोमती ठाकूर यांनी शिवशंकर भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली. 

           त्या पुढे म्हणाल्या की, त्यांनी संस्थानचे काम अतिशय पारदर्शक व  स्वछ ठेवले. संस्थानच्या माध्यमातून अनेक शाळा व उच्चशिक्षण संस्था निर्माण केल्यात. आनंद सागर सारखे भव्य दिव्य पर्यटन स्थळ निर्माण केले.  प्रामाणिकपणे व सचोटीने प्रत्येक पैशाचा हिशोब भाऊंनी ठेवला. जेव्हा जेव्हा काही नैसर्गिक संकटं आली त्यावेळी संस्थांनच्या माध्यमातून भाऊंनी तात्काळ मदत केली. कोरोना काळात देखील जिल्ह्याला मोठा आधार संस्थानच्या माध्यमातून मिळाला आहे. आज शेगावला जो दर्जा प्राप्त झाला आहे त्याचे संपूर्ण श्रेय आदरणीय भाऊंना जाते. त्यांच्या जाण्याने खरे गजानन भक्त हरवले आहेत, असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले.
Previous Post Next Post
MahaClickNews