यंग स्नेक फ्रेंड सोसायटी द्वारे १० दिवसात तब्बल चार दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ सापाला जीवदान

अमरावती प्रतिनिधी 
शनिवारी रात्री गांधीआश्रम इथे सार्वजनिक शौचालय मध्ये साप असल्याची माहिती संस्थेचे सदस्य दिलीप मसराम यांना मिळाली ते लगेच तिथे पोहाचले व सुखरूप त्यांनी त्याला पकडले व याची माहिती संस्थापक अवि प्रकाशराव येते यांना दिली, या आधी मंगळवारी २७ सायंकाळी पाऊने आठ च्या सुमारास यंग स्नेक फ्रेंड सोसायटी चे सदस्य निलय डोंगरदीवे यांना प्रभू विहार मधून आसरे यांचा फोन आल की काळ सोनेरी साप निघाला आहे तर ते लगेच तिथे पोहचले, त्यांनी बघून हा दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ साप असल्याचे समजले तेव्हा त्यांनी सुखरूप त्याला पकडले आणि त्याची पाहणी केली, त्याची प्रकृती उत्तम होती. याची माहिती त्यांनी संस्थापक यांना दिली हा साप दुर्मिळ आणि शेड्युल एक मध्ये मोळतो म्हणून याची वनविभागाकडे नोंद करून सोडायला त्यांनी सांगितले पण रात्र असल्याने निलय यांनी सकाळी वडाळी वर्तुळ फॉरेस्ट ऑफिस ला नोंद करून सोडले.
यंग स्नेक फ्रेंड सोसायटी चे सदस्य निलय डोंगरदीवे यांनी हा तिसऱ्यांदा रेस्क्यू केला आहे. तीन दिवस आधी सुद्धा एक इंडियन एग इटर  (भारतीय अंडी खाऊ साप) त्यांनी पकडला होता, तो त्यांनी न्यू स्वस्तिक नगर, शारदा विहार येथे रात्री साडे दहा च्या सुमारास पकडला होता त्याची प्रकृती सुध्दा चांगली होती  त्यांनी त्याला फॉरेस्ट ऑफिस मध्ये नोंद करून सोडले व त्या आधी शिवशंकर नगर ला पकडला होता त्याची सुद्धा प्रकुती चांगली होती पण तेव्हा त्यांनी लगेच त्याला सोडून दिले होते, सर्वात आधी पकडलेल्या सापाची लांबी अंदाजे दिळ फूट होती आणि नंतर पकडल्या सापाची लांबी २५ इंच (६३सेमी) होती व तिसऱ्यांदा पकडलेल्या सापाची लांबी १२ इंच म्हणजेच ३०सेमी होती तर आता गांधिआश्रम मध्ये पकडल्या सापाची लांबी ही १९ इंच म्हणजेच ४८सेमी आहे . हे साप जिथे रेस्क्यू करण्यात आले त्या चारही जागेतील अंतर दोन किलोमीटर आहे. संस्थेच्या या पूर्वी च्या नोंद नुसार या वर्तुळ क्षेत्रात या सापाची वाळ होत आहे, या आधी हनुमान नगर, महाजन पुरा, गांधीआश्रम ( दोन वेळा आधी २०१५ ला रेस्क्यू करण्यात आला होता), शिक्षक कॉलनी, वल्लभ नगर, पार्वती नगर १, माळा कॉलनी आणि आता शिवशंकर नगर व शारदा विहार नंतर प्रभू विहार याचा अर्थी या परिसरात याचे वास्तव्य आहे. 
जगात अंडी खाऊ सापांच्या १३ प्रजाती असून त्यातील १२ प्रजाती डायसेपेल्टिस या गणातील आहेत. भारतीय अंडी खाऊ साप एकमेव इल्याकिस्टोडॉन या गणामधील आहे. शिवाय, भारतीय अंडीभक्षक साप हा आशिया खंडात आढळणारा एकमेव अंडी खाऊ साप आहे.
या सापाचे वर्णन शरीरावर चमकदार तपकिरी ठिपके, डोक्यापासून ते शेपटीपर्यंत पिवळसर पांढऱ्या रंगाची रेषा, पूर्णपणे विकसित सापाची लांबी 31 इंच, निमविषारी, शांत स्वभावाचा असतो, झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यातील अंडी हे खाद्य
जागतिक पातळीवर वन्यजीवांचा अभ्यास करून त्यांच्या नोंदी ठेवणारी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) या सापाला 1969 मध्ये रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. जगभरात केवळ भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या तीनच देशात सापाची ही प्रजात आढळून येते. अत्यंत दुर्मीळ असलेल्या या प्रजातीचे जतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची योजना नसल्यामुळे नेपाळ, बांग्लादेशसह भारतातूनही ‘इंडियन एग इटर’ नामशेष जाहीर केले होते.
इंडियन एग इटर’ सर्प 1996 मध्ये नामशेष झाल्याचे जाहीर झाल्यानंतर 2004 ला अमरावती येथे आढळून आला. इथल्या प्रशासनाने तशी नोंद घेऊन ‘आययुसीएन’ला ही माहिती पाठवली. त्यामुळे अमरावतीची नवी ओळख जागतिक पातळीवर झाली आणि या आधी 2003 ला वर्धेत सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचा पुनर्शोध आणि महाराष्ट्रातली प्रथम नोंद सिद्ध करणारा शोध निबंध लिहला. रशिअन जर्नल ऑफ हर्पेटोलॉजि या शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या पत्रिकेत तो २००५ साली प्रकाशित झाला. भारतीय अंडीभक्षक सापाचा आढळ महाराष्ट्रातल्या ९ जिल्ह्यांमध्ये दिसू येतो. त्यातले ८ जिल्हे हे विदर्भात आहेत. शिवाय, तेलंगाना राज्यातल्या बेलम्पल्ली इथं सुद्धा या सापाचं अस्तित्व दिसून आलं आहे.
या सापाचे अस्वतिव असेच कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे, विदर्भ हा भारतीय अंडी खाऊ सापाचा महत्त्वाचा अधिवास असून विदर्भातील शेकडो एकर झुडपी जंगले आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. झुडपी जंगले संपुष्टात येत असल्यानेच पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत आहे. त्यांच्या अंड्यांवर गुजराण करणारा अंडी खाऊ साप पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच रस्त्यांवर या सापांचे मृत्यू होण्याचं प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे, या सापांची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. भारतीय अंडी खाऊ साप हा फक्त पक्ष्यांची अंडी खाऊनच आपली उपजीविका चालवितो. अंडी सोडून इतर कुठलेही भक्ष्य तो खात नाही. हा साप वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ नुसार अनुसूची एक म्हणजेच वाघ असलेल्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. या अनोख्या आणि विशेष सापाच्या संवर्धनाची आणि अध्ययनाची गरज आहे. 
असे संस्थापक अवि प्रकाशराव येते यांनी सांगितले
Previous Post Next Post
MahaClickNews