उद्योग उभारणीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुशिक्षित बेरोजगारांसाठी संधी ; जिल्हा उद्योग केंद्राची योजना

अमरावती, दि. ४ : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रांत सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची लोकसंख्या वाढत आहे. तसेच बेरोजगारांसाठी उद्योग, व्यवसाय क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगाराच्या नविन संधीही निर्माण होत आहेत. सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींना स्वत:चा उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही योजना दि. 01 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

            या योजने अंतर्गत 18 ते 45 वयोगटातील किमान 7 वी उत्तीर्ण सुक्षिशित बेरोजगारांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी 25 ते 50 लाखापर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्याची सुविधा आहे.  योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महीला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादेत अधिक 5 वर्ष सूट दिलेली आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी घटकांना 25 टक्के ते 35 टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेसोबतच केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ऑनलाईन अनुदानीत योजना कार्यान्वीत आहे.

            सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आवडेल तो व्यवसाय निवडण्याची व करण्याची संधी मिळावी या दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सन 2021-22 मध्ये राबिण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र व ईच्छूक व्यावसायिकांनी / उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews