वेक्स तर्फे या वर्षी सुद्धा उपलब्ध होणार मातीच्या गणेश मूर्तीं

अमरावती : वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (वेक्स WECS), अमरावती या संस्थेच्या “मातीचा गणपती बसवा; निसर्गाशी बांधिलकी दाखवा” या उपक्रमाचे यावर्षी सोळावे वर्ष असून, अमरावती जिल्ह्यात १६ वर्षापूर्वी संस्थेने सर्वप्रथम २००५ साली या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात केली होती. या उपक्रमांतर्गत संस्थेतर्फे दरवर्षी गणेशोत्सवा पूर्वी मातीचे गणपती मूर्ती घडवा कार्यशाळा तथा पर्यावरण जनजागृतीपर उपक्रम राबविले जाता असतात. या अंतर्गत गणेश चतुर्थी दरम्यान भाविकांना मातीच्या मूर्ती उपलब्ध करून देणे तसेच मातीच्या मूर्तींचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने संस्थेचा स्टाँल दरवर्षी नेहरू मैदान येथे लावण्यात येतो. यावर्षी कोव्हीड संसर्गामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशाने संस्थेने कमी प्रमाणात मूर्ती उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून नेहरू मैदान दोन ऐवजी तीन दिवस स्टाँल लाऊन मूर्ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून कोव्हीड संसर्ग काळात सुद्धा आपली परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या या स्टाँल चे उद्घाटन दि. ०८ सप्टेंबर २०२१  रोजी होणार असून पुढील तीन दिवस मूर्ती उपलब्ध असणार आहेत.

संस्थेने सातत्याने १५ वर्षापासून राबविलेल्या उपक्रमामुळे आज मातीच्या मूर्तींकडे भाविकांचा कल वाढलेला असून, मागणी वाढल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मातीच्या मूर्ती उपलब्ध होत आहेत तेव्हा भाविकांनी बाजारातून मूर्ती विकत घेताना मातीचीच आहे हे बघूनच मूर्ती घ्यावी व पर्यावरण संवर्धनसाठी हातभार लावावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या उपक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ. श्रीकांत वऱ्हेकर संस्थेचे सचिव डॉ. जयंत वडतकर, अध्यक्ष प्रा.डॉ. अंजली देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. गजानन वाघ,  डॉ. मंजुषा वाठ, प्रा.डॉ. रमेश चोंढीकर, श्री. किरण मोरे, सौरभ जवंजाळ, मनीष ढाकुलकर यांचेशी संपर्क साधावा असे सचिव डॉ जयंत वडतकर (9822875773)  यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews