सदृढ आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करा - प्रा.जया काळे

अकोट :  प्रतिनिधी 
             रविंद्र इंगळे 
अकोट: येथील श्रद्धासागर येथे आहार व आध्यात्मातून स्वास्थाकडे कार्यशाळा सदृढ शरीर स्वास्थ, शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेम या पाच गोष्टी मनुष्याला सुख प्राप्त करुन देतात.यातील एका गोष्टीचा जरी अभाव असला तर सुख  मिळणं दुरापास्त आहे.या सुखासाठी निसर्गाशी जुळवून आपले जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.त्यासाठीआहार प्रणालीचं महत्व जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.असे मौलिक मार्गदर्शन प्रा.जया काळे यांनी श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे केले.
वारकरी भवनात आयोजित आहार व आध्यात्माकडून संपूर्ण स्वास्थाकडे या एक दिवशीय कार्यशाळेत प्रा.जया काळे बोलत होत्या.रविवारी श्रद्धासागर येथील एक दिवशीय कार्यशाळेला स्थानिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.
निरोगी आयुष्यासाठी आपला आहार हा संतुलित असायला हवा.जास्तीचा भरपेट आहाराने शरीरात विविध समस्या निर्माण होतात.विविध आजाराने उद्भवतात.या आजारापासून मुक्तता हवी असेल तर नैसर्गिक आहार प्रणालीचा अवलंब करा.फलहार,हिरवा भाजीपाला,फलभाज्यांचा जुस,अंकुरीत कडधान्ये याचा संतुलित आहार घ्या.गहू,ज्वारी,बाजरी चा वापर हा अत्यल्प असावा. फास्टफुड टाळावे. त्यामुळे आपण आहार विषयक सजग  रहावे असा सल्ला प्रा.जया काळे यांनी दिला. विविध संशोधीत तथ्य सोदाहरण देवून त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
दुपारचे सत्रात दिलिप काळे यांनी विविध पॕथी व औषधोपचाराचे दृष्यपरिणाम यांची शास्त्रोक्त माहीती दिली.शेतकरी नेते ललित बहाळे यांनी आपले मनोगतात आहार आणि आरोग्य यावर मार्गदर्शन केले.भाऊराव बकाल,भैयासाहेब बकाल,स्मिता बकाल,अनुजा गावंडे,योगीता थोटे यांनी विषयांकित महत्वाची जबाबदारी पार पाडली.
आहार व स्वास्थ विषयक शिबीराचे निशुल्क आयोजन करण्यासाठी जया काळे व  कुटुंबीय आपले उत्पन्नाचे १०%हिस्सा खर्च करुन कार्य करीत आहे.या निष्काम सेवे पित्यर्थ त्यांचा संस्थेद्वारा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड.गजानन पुंडकर,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे,प्राचार्य गजानन चोपडे,मोहनराव पु.जायले,नंदकिशोर हिंगणकर ,अनिल कोरपे,अॕड.मनोज खंडारे,अनंत गावंडे,प्रा.गजानन हिंगणकर ,प्रा.पुरुषोत्तम जायले सह महिला पुरुष शिबीरार्थी हजर होते,
Previous Post Next Post
MahaClickNews