कालवाडी येथे हुतात्म्यांचे स्मरणार्थ वृक्षारोपन

अकोट: प्रतिनिधी 
भारतीय स्वातंत्रासाठी आपले सर्स्व अर्पन करणा-या तेजस्वी क्रांतीकारकाचे स्मृती प्रित्यर्थ अकोट तालुक्यातील कालवाडी येथे वृक्षारोपन करुन स्वातंत्रविरांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
सेवा सहकारी सोसायटी कालवाडी चे नुतन इमारतीचे प्रांगणात सहकार नेते नानासाहेब हिंगणकर व दयाराम पाटील व पदाधिका-यांचे हस्ते वृक्षारोपन पार पडले.अध्यक्षस्थानी सोसायटीचे सभापती प्रमोद हिंगणकर  होते.
सहकार नेते दयाराम पाटील यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पन करुन शेती आणि शेतक-यांच्या हितसंवर्धानात सहकारी संस्थांचे कार्याचे महत्व विशद केले.तर नंदकिशोर हिंगणकर यांनी स्वातंत्र चळवळीतील हुतात्म्याचा जाज्वल इतिहासाला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा.अरुण हिंगणकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अमोल हिंगणकर यांनी केले. यावेळी जगन्नाथ पाटील, कालवाडीचे माजी सरपंच दादासाहेब हिंगणकर ,शिवशंकर कोकाटे,दिंगाबर च-हाटे,उद्धवराव वानखडे,भिसे ,उपसभापती गजानन रावणकार,गजानन देवळे,धिरज हिंगणकर,अनिल हिंगणकर ,विरेंद्र तेलगोटे,शरद हिंगणकर ,वसंतराव हिंगणकर ,गणेश हिंगणकर ,अशोक हिंगणकर ,अविनाश होनाळे,अवदूत रावणकार,सुनिल तेलगोटे रवि हिंगणकर ,नागोराव कराळेसह  बँकेचे वरिष्ठ निरिक्षक मस्करे,निरिक्षक खवले यांचेसह सहकारी संस्थेचे भागधारक शेतकरी व सहकार कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews