अमरावती ब्युरो.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताताई नगर तालुक्यामध्ये चारठाणा या ठिकाणी चार मित्रांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या सोहळा मैत्रीच्या या कार्यक्रमाला विशाल स्वरुप आले आहे. कार्यक्रमाची सुरूवात कॅमेराचे पुजन करून करण्यात आले व्यासपीठावर महाराष्ट्रतील फोटोग्राफी क्षेत्रातील दिग्गज व तज्ञ मंडळी होती सुरूवातीला 100 छायाचिकार यांची उपस्थिती होती, तर दुसर्या वर्षी 1000 छायाचित्रकारांची उपस्थिती होती. यावर्षी 26 सप्टेंबर 2021 रोजी हा सोहळा पार पडला, यावर्षी संपुर्ण राज्यातून तब्बल 2000 हजार छायाचित्रकारांनी आपली उपस्थित लावली. या कार्यक्रमची विशेषत: म्हणजे सर्व छायाचित्रकार एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते. नवीन छायाचित्रकारांची भेट होते. शासन दरबारी कुठल्या मागणी करू शकतो याकरिता सल्लामसलत केली जाते. महाराष्ट्रात फोटोग्राफीसाठी इतर जिल्ह्यात जातो, तेव्हा काही काम पडल्यास किंवा अडचण आली तर मैत्री सोहळ्यात ओळख झाल्यावरची ती ओळख या ठिकाणी कामात येते. सोहळ्यासाठी राज्यातुन आलेले जिल्ह्यातील विविध असोसिएशनचे अध्यक्ष मंचासीन होते, यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद चौधरी यांनी केले छायाचित्रकार एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण होते सोहळ्यात भेटल्यावर एकमेकांशी ओळख होते एकत्र येऊन छायाचित्रकार यांचे प्रश्नन शासन दरबारी माडल्या जाऊ शकतात आलेल्या छायाचित्रकार यांचे त्यांनी स्वागत केले व आभार मानले
बॉक्स
समाजमाध्यमांच्या मित्रांशी थेट भेट
जे समाजमाध्यमांवर मित्र आहे, ते प्रत्यक्षात भेटत नसेल तर या सोहळ्यात गेल्यावर अनेक छायाचित्रकार मित्रांशी थेट भेट होते. विशेष म्हणजे या सोहळ्याची पत्रिका नसते, फक्त सोशल मिडीयाच्या माध्यमातून निमंत्रण असते. या निमंत्रणवरून महाराष्ट्रातुन छायाचित्रकार या सोहळ्यात उपस्थिती राखुन सोनेरी क्षणाचे साक्षीदार होतात. येथे जेवणाची विशेषत: म्हणजे केळीचे पानावर भाकर, मिर्चीची भाजी, जिलेबी असा बेत असतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी दोन महिन्यापासून मेहनत घेतली *आयोजक*
विनोद चौधरी, संजय खर्चे, अभिनय नाईक, रवि महाजन, अनिल पाटील,
योगेश शर्मा, सुनिल महाजन, संदिप धामोडे, मनोज पाटिल, पप्पु शेठ,
किरण पाटील, दिगांबर जाधव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविकिरण टाकळकर यांनी केले
यावेळी या सोहळ्यासाठी अमरावतीवरून अंबानगरीचे पदाधिकारी उपस्थित होते.