जेसीआय अकोट जेसीरेट विंग द्वारा महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी उद्योजक महिलांचा सन्मान

रविंद्र इंगळे 
अकोट : जेसीआय अकोट जेसी रेट विंग च्या वतीने जेसी सप्ताह अंतर्गत  "स्वयंसिद्धा"" महिलांनी महिलांसाठी स्वावलंबी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा स्थानिक बीलबीले  मंगल कार्यालय अकोट येथे 11 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. 
महिला सन्मान मेक इन इंडिया या संकल्पनेनुसार बचत गटातील महिला व शहरातील  महिलांसाठी त्यांच्या मध्ये उद्योजकता हा गुण निर्माण व्हावा. त्यांनी स्वबळावर आपला व्यवसाय सुरु करता यावा, स्वावलंबी बनून सक्षम व्हावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अकोला येथील  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी  यांनी  पी.पी.टी द्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये त्यांनी
महिलांनी आपला व्यवसाय- उद्योग कसा उभारायचा. त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य कसे मिळवायचे, प्रकल्प अहवाल कसा सादर करायचा, जिल्हा उद्योग केंद्र यामधील योजना, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ध्येय काय आहे. याची नोंदणी कुठे व कशी करावी. अशा महत्त्वपूर्ण विषयावर प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.  कार्यक्रमा दरम्यान अकोट परिसरातील महिला यशस्वी उद्योजक रंजना टवले,  कांचन चौधरी , स्वाती राजेंद्र मुंढेरे, जयश्री संजय महतकर, कीर्ती महेंद्रसिंग रघुवंशी आदींना संस्थेतर्फे सन्मानित
करण्यात आले.
यावेळी मंचावर मार्गदर्शक प्रसन्न रत्नपारखी, प्रमुख अतिथी सतीश हाडोळे, जेसीआय चे पूर्व अध्यक्ष अरविंद लहाने, प्रशांत खोडके, पवन ठाकूर, अध्यक्ष नितीन शेगोकार, सप्ताह प्रमुख अजय अडोकार, जेसी रेट विंग चेअर पर्सन प्रज्ञा घाटोळ, जेसीरेट वैशाली शेगोकार, प्रकल्प प्रमुख पल्लवी गणगणे, जेसिरेट  विंगच्या सचिव पूजा मिरकुटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकल्पाकरिता जेसी रेट विद्या मिरकुटे, सुषमा झाडे, रजनी पवार, शारदा लहाने, राजश्री बाळे, वंदना झाडे, वंदना व्यवहारे , प्रीती बनसोड, ममता टावरी, मंगला गणोरकर, दिपाली कडू, रश्मी अडोकार, शितल लहाने, पुनम भीरडे, अरुणा खोडके, जानवी चावडा, शुभांगी पिंपळे, स्वरा व्यवहारे, मयुरी पवार, सुरभी उपासे उपस्थित होत्या. अशी माहिती  सप्ताहाचे  जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनसोड यांनी दिली.
Previous Post Next Post
MahaClickNews