रविंद्र इंगळे
अकोट: अकोट शहरातील नया प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 'रक्तदान शिबिर' आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उद्घाटक म्हणून अकोट शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक प्रकाश अहिरे हे लाभले होते.यावेळी पोलिस निरीक्षक अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये आजच्या कोरोना प्रार्दुभाव काळात सदर गणेशोत्सव युवक मंडळ रक्तदान शिबिर आयोजित करत आहे या पेक्षा दुसरे मोठे कार्य कोणतेच असू शकत नाही असे गौरवोद्गार काढले. असे समाजपयोगी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित होणे ही काळाची गरज असून त्यामधून समाजात एक आदर्श निर्माण होईल.असे सांगितले. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलतांना सांगितले की,सदर कोविड परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्तदानाविषयी समाजात जागृती होणे गरजेचे आहे.कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये अतुल पांडे,विशाल कोरोडे,सचिन कल्पेकर,सचिन पांडे,माधव अनासने यांच्यासह शिबिराला यशस्वी करण्यासाठी अनिकेत कुलट,ऋषी गावंडे,जगदिश वानखडे ,शंतनू ढोले,ऋषभ भास्कर,अक्षय गावंडे,गौरव सुरत्ने,जय भाकरवले,शुभम राऊत,सागर मार्के,निखील कुलट,शंतनू हिंगणकर,वेदांत देवतडे,शुभम लाकडे,नितीन गुजरे,गजानन भिसे,यश महाले,मंगेश वडोकार,कुंदन पाठे,कृष्णा वसु,गजानन कुलट,ऋत्विक वानखडे या गणेशोत्सव मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.यावेळी अकोला लेडी हार्डींग रक्तदान विभागाचे डॉ.सुनील जोशी,भारती पानझाडे,देवानंद धांडे, अजय गोपणारायन,सूर्यभान कोरी,मयुरी कठोरे,शैलेश डोंगरे,राहुल इंगोले आदींसह मान्यवर उपस्थित होते.शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.