जय फोटो लॅब द्वारें आयोजित फोटो एक्पो ला जबरदस्त प्रतिसाद

अमरावती (28सप्टेंबर)स्थानिक  अंबादेवी रोड स्थित जय फोटो लॅब व कॅमेरा शॉपी व निकिता डिस्ट्रीब्यूटर यांच्या वतीने आयोजीत फोटोग्राफी साहित्यांच्या एक्पो ला फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर्स बंधूनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवळपास 8 ते 10 कंपनीच्या शेकडो प्रोडक्ट बद्दल माहिती जाणून घेतली.
हॉटेल रॅलीश रेसिडेन्सी येथे या एक्पो चे निशुल्क आयोजन सकाळी 11ते 5 या वेळेत करण्यात आले होते.
अमरावती मधील इतक्या मोठया प्रमाणातील हे पहिलेच आयोजन होते. 
अमरावती, परतवाडा, दर्यापूर, चांदुर बाजार, पुलगाव ,वर्धा, मुर्तिजापूर, चांदुर रेल्वे , नेर, नांदगाव, पुसद, दिग्रस येथील फोटोग्राफर्स मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कॅमेरा व फोटोग्राफी साहित्याच्या बुकिंग वर आठ दिवस विशेष सवलत असणार आहे. 
 या आयोजनामध्ये गोडॉक्स कंपनीचे ऑक्टा सोफ्टबॉक्स , क्विक ऑक्टा , सॉफ्टबॉक्स, स्टुडिओ लाईट, कॅमेरा फ्लॅश, LED लाइट्स, रिंग फ्लॅश, पॅराबोलिक सोफ्टबॉक्स, रिफ्लेक्टर व इतर फोटोग्राफी साहित्य डेमो साठी उपलब्ध होते.
फुजीफिल्म कंपनी च्या वतीने 
वेडिंग स्टेज व मॉडेल सह लाइव्ह शुटिंग चे प्रात्यक्षिक देण्यात आहे.
व्हॅनगार्ड कंपनीचे प्रिमीयम ट्रायपॉड व कॅमेरा बॅग,
मोझा कंपनीची गिंबल ची संपूर्ण रेंज सुध्दा उपलब्ध होती.
सॅमयांक कंपनीच्या लेन्सेस चा लाइव्ह डेमो मुंबई येथून आलेल्या तज्ञ मंडळींनकडून  फोटोग्राफर बंधूनी खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतला.
निसी चे U.V फिल्टर्स, 
लिलिपुट चे "4K कॅमेरा मॉनीटर्स.
हायटी व डेटा कलर फोटोग्राफी प्रिंटर्स. मीरफॅक कंपनी चे कॅमेरा माईक,
न्यू वेल कंपनी च्या सर्व बॅटरीज,
थिंक टैंक कंपनीच्या वाईल्ड लाईक फोटोग्राफी साठी लागणाऱ्या प्रिमियम कैमेरा बॅग व या व्यतिरिक्त सुध्दा अनेक प्रकारचे फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी साहित्य उपस्थितांना बघता आले.
उपरोक्त आयोजनाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याबद्दल जय डिजिटल फोटो लॅब चे वैभव दलाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Previous Post Next Post
MahaClickNews