जेसीआय अकोट च्या वतीने फुफ्फुसांची कार्यक्षमता व किडनी तपासणी शिबिर

रविंद्र इंगळे 
अकोट: भारतीय जेसीज ची शाखा असलेले जेसीआय अकोट या संस्थेने वतीने अकोट शहरातील नागरिकांसाठी दिनांक 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या दरम्यान साजरा होणार्‍या जेसी सप्ताह अंतर्गत आरोग्य धनसंपदा या शिबिरा  अंतर्गत फुफ्फुसांची कार्यक्षमता व किडनी तपासणी  शिबिराचे आयोजन नुकतेच 9 सप्टेंबर रोजी निशांत
कॉम्प्लेक्स जयस्तंभ चौक अकोट येथे पार पडले.
मेडिकल क्षेत्रातील महागडी तपासणी नागरिकांसाठी निशुल्क  उपलब्ध व्हावी व नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची सुरुवात सप्ताह प्रमुख जेसी jfm अजय अडोकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 
या शिबिरामध्ये covid नियमाचे पालन करीत अकोला येथील फुफुस तज्ञ डाॅ.राम देवडे  व किडनी रोग तज्ञ डॉ.मालविया तसेच सहाय्यक डॉ.सचिन इंगळे व मयूर बारड यांनी  आरोग्याची तपासणी करून त्या विषयी मार्गदर्शन केले .
तसेच कार्यक्रमा दरम्यान Covid  व्हॅक्सिनेशन विषयी मार्गदर्शन तथा जनजागृती व covid-19  व्हॅक्सिनेशन  गैरसोय टाळता यावी यासाठी  शासकीय व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह या प्रकल्पाअंतर्गत  ॲप द्वारे  व्हॅक्सिनेशन बुक करता यावे याविषयी जेसी अमोल टावरी यांनी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर  किशनचद घुडीयाल,  जेसी दिलीप हरणे, जेसी दामोदर पवार , जेसी प्रशांत खोडके.  पवन ठाकूर. अध्याय अध्यक्ष जेसी  नितीन शेगोकार सप्ताह प्रमुख अजय अडोकार,अध्याय सचिव जेसी सागर बोरोडे , प्रकल्प प्रमुख जेसी भगवान लांडगे उपस्थित होते. 
तर या प्रकल्पाकरिता अध्यायाचे पूर्वाध्यक्ष जेसी संजय पवार नंदकिशोर शेगोकार, अशोक गट्टाणी, आनंद भोरे, आनंद बाळे , रत्नाकर मिरकुटे, निलेश हाडोळे आदींचे मार्गदर्शन लाभले. 
तसेच या प्रकल्पाकरिता  जेसीआय चे सदस्य जेसी अमित ठाकूर, प्रसाद देशपांडे , अतुल भीरडे, विनोद कडू, प्रवीण बनसोड, अंकित  झुनझुनवाला, विवेक गणोरकर, राहुल शेगोकार, रुद्रम झाडे, स्मित पवार, निलेश इंगळे, अमोल टावरी,, अभिषेक दुबे, भरत कोथळकर, किशोर लहाने, शिरीष घाटोळ यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
MahaClickNews