फोटोग्राफी, व्हिडीओ एडिटिंग कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसादअंबानगरी फोटो व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनचे आयोजन

(वा.).अंबानगरी फोटो व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनच्या वतीने 1 व 2 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला कॅमेरा व व्हिडीओ ग्राफीची ओढ असणार्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी अंबादेवी व एकविरा देवीच्या फोटोचे पुजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष राजेश वाडेकर, मार्गदर्शक अनिल पडिया, माजी अध्यक्ष विजय देवानी, माजी अध्यक्ष मनीष जगताप, सल्लागार रामेश्वर गुल्हाने, प्रकल्प प्रमुख महेंद्र किल्लेकर, निखील तिवारी  मार्गदर्शक आकाश लादे, अजय मांडळे उपस्थित होते. फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर्ससह ज्यांना या क्षेत्राची ओढ आहे, त्यांना सखोल ज्ञान मिळावे याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 1 सप्टेंबर रोजी फोटोग्राफी या विषयी प्री वेडिंग शुट कसे करावे, लायटिंग पोजेस, वाईड अँगल, शुट फ्रेमिंग, लेन्स कोणते वापरले पाहिजे, लोकेशन कसे असायला पाहिजे, आऊटडोअर शुट कसे करावे, जोडप्यासह प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या कार्यशाळेसाठी विदर्भातुन छायाचित्रकार उपस्थिती होते. पहिल्या दिवशी कार्यशाळेला मार्गदर्शन युवा छायाचित्रकार आकाश लादे यांनी केले. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी व्हिडीओ एडिटिंग कार्यशाळा घेण्यात आली. वेडिंग व्हिडीओ एडिटिंग कसे करावे, हायलाईट कसे तयार करावा व्हिडीओमध्ये कलर सेटिंग कसे करावे, कॉम्प्युटर मेंटेनन्स बद्दल माहिती देण्यात आली. अजय मांडळे यांनी दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला अमरावती, अकोला ,नागपुर ,बुलढाणा ,वाशिम ,शेगाव , यवतमाळ या जिल्ह्यातुन फोटो व व्हिडिओ ग्राफर्स उपस्थित होते. सामारोपीय कार्यक्रमात लकी ड्रा काढण्यात आले. नागपुर येथील प्रविण लँबच्यावतीने सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी नागपुर येथील प्रविण लँबचे संचालक प्रविण जैन यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यशाळेला मार्गदर्शन केले. आकाश लादे व अजय मांडळे यांचा असोसिएशन कडुन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत सर्व सहभागीना प्रमाणपत्रसुध्दा देण्यात आले. संपूर्ण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेश वाडेकर, यांच्यासह प्रकल्प प्रमुख महेंद्र किल्लेकर, निखिल तिवारी, प्रतीक रोहणकर, प्रशांत टाके, राहुल आंबेकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेला उपस्थित असोसिएशनचे पदाधिकारी गजानन अंबाडकर, राहुल पालेकर, दिनकर तायडे, प्रविन काळे, मयुर राउत, निलश्याम चौधरी, संजय साहु, श्याम गादगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Previous Post Next Post
MahaClickNews