भाजप शिक्षक आघाडीचं उपसंचालक कार्यालयावर धरणे आंदोलन - संगीताताई शिंदेनी केले मार्गदर्शन

अमरावती येथे भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलच्या वतीनं काही प्रमुख मागण्यांना घेऊन राज्यव्यापी धरण आंदोलन करण्यात आले. यावेळी


मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून शिक्षक उपस्थित राहिले. कित्येक वर्षांपासून शासनाचं शिक्षण क्षेत्रावर दुर्लक्ष झालं आहे. शिक्षक असो की शाळा शासन लाभापासून वंचीत राहिले आहे. हजारो शिक्षक विनाअनुदान तत्त्वावर काम करीत आहे. परंतु वाढती महागाई आणि उदरनिर्वाहाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या शिक्षकाला आत्महत्या करण्याची वेळ हे बेजबाबदार शासन आणून देत आहे.तसेच जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी याकरिता राज्यभरातून आंदोलन मोठ मोठी उपोषण झाली आहे आझाद मैदान मुंबई याठिकाणी हाजारोच्या संख्येनं संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात शिक्षक एकत्र आले होते परंतु फेके आश्वासनंच शासनाकडून एकायला मिळाले.भारतीय जनता पार्टीच्या सरकारने २० टक्के आणि ४० टक्के अनुदानाची मंजुरात केली होती त्यापुढे या महाभकास आघडीन अद्याप काहीच योग्य निर्णय घेतला नाही. गेल्या दीड वर्षांपासून शाळा/महाविद्यालय बंद आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी अक्षरशः वाम मार्गाला जात आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल पासून नाही ते डोळ्यांचे आजार वाढतांना आपण बघतो आहे. सद्या जगामध्ये 170 देशात शाळा सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना अद्याप धोका निर्माण झाला नाही आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शाळा महाविद्यालयांना सुरू करण्याची परवानगी द्यावी असं भाजपा शिक्षक सेलच्या सहसयोजिका सौ. संगीताताई शिंदे बोलतावेळी म्हणाल्या आहे. काय आहेत ? प्रमुख मागण्या... 1. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत. 2. विना / अंशतः अनुदानित शाळांना व अघोषित शाळांना त्वरित घोषित करून १००% अनुदान द्यावे तसेच अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण देऊन समायोजित करावे. 3. वरिष्ठ व निवड श्रेणी च्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित करणे बाबत. 4. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरु करण्याबाबत. 5. ९ तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतन विलंब करणाऱ्या संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत. 6. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्याची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्ती ची रक्कम तात्काळ देय करण्याबाबत. 7. परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेत्तर कर्मचारी (शिक्षकेत्तर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढविण्याबाबत. 8. शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करणेबाबत. 9. शिक्षकांना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्याबाबत. 10. अमरावती विभागातील उपसंचालक स्तरावर प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडी प्रकरणे त्वरित निकाली काढणे बाबत. 11. राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन CMP प्रणालीद्वारे करण्यात यावी. 12. वाशीम जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक वेतन पथकासाठी पूर्ण वेळ स्वतंत्र वेतन अधीक्षक देण्यात यावेत. 13. आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय प्रोत्साहन भत्ता मिळणे बाबत. या प्रमुख मागण्यांना घेऊन आज उपसंचालक कार्यालयावर राज्यव्यापी धरण आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील भाजपा शहराध्यक्ष किरणजी पातूरकर भाजपा शिक्षक सेलचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष कल्पना पांडे, व सह सयोजिका संगीताताई शिंदे बोंडे यांच्यासह कृतीसमितीचे राजिक पठाण  भाजपा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews