मातीचे गणपती बसवा निसर्गाशी बांधिलकी ठेवा वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाचे सोळावे वर्ष

अमरावती 
वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यांचे वतीने गेल्या पंधरा वर्षापासून अमरावती शहरांमध्ये मातीचे गणपती बसवा निसर्गाशी बांधिलकी दाखवा हा उपक्रम राबविला जात आहे. यंदा या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे. यंदा करोंना महामारी चे काळात गर्दी टाळण्याचे हेतूने एक दिवस आधीच अमरावतीकरांना मातीच्या गणपती मूर्ती उपलब्ध करून देण्याकरिता नेहरू मैदान येथे स्टॉल चे औपचारिक उद्घाटन  9/9/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री भूषण जोशी मुख्य अभियंता ,सा. ब वी  अमराव ती विभाग व श्री  सुनील थोटांगे कार्यकारी अभियंता  शुभहस्ते  सार्वजनिक  बांधकाम विभाग,  यांचे हस्ते  पार पडले 
अमरावती शहरात पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती यासाठी आमची WECS ही संस्था गेली २० वर्ष कार्य करीत असुन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पासुन होणारे प्रदुषण रोखण्यासाठी सर्वप्रथम आम्ही याबाबत जनजागृती आणि मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. आज हा विचार जनमानसात लोकप्रिय झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
कार्यक्रमाला सौ वैशाली थोटांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री विनोद बोरसे . उपस्थित होते
या कार्यक्राअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष डॉ अंजली देशमुख, सचिव डॉ जयंत वडतकर, कोषाध्यक्ष डॉ गजानन वाघ , सहसचिव डॉ. मंजुषा वाठ, श्री किरण मोरे, डॉ रमेश चोंडेकर, डॉ दिलीप हांडे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ श्रीकांत वऱ्हेकर, डॉ रिना लाहिरी, डॉ कुलकर्णी, कानस्कर काका
सौरभ जवंजाळ,  मनीष ढाकुलकर, जगदेव एवाने यांनी  अथक परिश्रम घेतले.  पर्यावरण जनजागृती या समान धाग्याने संस्थेशी विविध महाविद्यालया चे  विद्यार्थी जोडल्या गेलेत त्यात  वैष्णवी फाळके, अंकिता सुपले, तेजस गुल्हाने,सुमेध पुतळे, जय पाटील, प्रज्वल उमाळे, शशांक नग्रळे या  विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.
Previous Post Next Post
MahaClickNews