उमेद अभियानाअंर्तगत महिला बचत गटांना गोट बँकेचा लाभ मिळावा महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई दि.12  ग्रामीण भागात 'अमुलाग्र' आणि 'क्रांतीकारी' बदल घडवून आणणारा 'गोट बँक हा प्रयोग आहे. यामुळे ग्रामीण भागात विकास आणि स्वयंपुर्णतेचं एक नवे पर्व सुरू होईल. बचत गटांतील  महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'गोट बँक हा प्रयोग राबविला जात असून  महिला आर्थिक विकास महामंडळाबरोबरच  उमेद अभियानाअंर्तगत महिला बचत गटांना गोट बँकेचा लाभ मिळावा, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
                राज्यात गोट बँक उपक्रमाबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गोट बँकेचे संचालक नरेश देशमुख ,माजी जिल्हा परिषद  सभापती जयवंतराव देशमुख, गोट बँकेचे ट्रस्टी अभिजीत देशमुख, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
            महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, शेती व्यवसायाला जोडधंदा गोट बँक हा उपक्रम लोकाभिमुख शासनाचा मानस आहे.  अर्थशास्त्रातल्या 'कंपाऊंडींग'च्या सुत्रानूसार 'गोट बँक ही संकल्पना आहे. 
 'गोट बँक ऑफ कारखेडा'चा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.
   ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ  म्हणाले, एखाद्या गावात गोट बँक स्थापन केल्यानंतर या संकल्पनेचे दृष्य परिणाम दाखविण्यासाठी त्यांना कारखेडा सारखे कामाचे 'मॉडेल'  उभे करणे आवश्यक आहे. 'गोट बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होईल. उमेद अभियानाअंर्तगत महिला बचत गट समुहाचा गोट बँकेत सहभाग व्हावा.
Previous Post Next Post
MahaClickNews