निरीक्षणगृह- बालगृहातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वस्तूंचे बचतभवनात प्रदर्शन पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी सकाळी १० वाजता शुभारंभ

अमरावती, दि. ३० : शासकीय मुलीचे निरीक्षणगृह व बालगृह 
येथील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या उत्तमोत्तम वस्तूंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शन ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला बचतभवनात आयोजित करण्यात आले आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर येथील निरीक्षणगृह व बालगृहा
विद्यार्थिनींना 'आर्ट अँड क्राफ्ट'चे २ महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. संस्थेतील प्रवेशिताच्या कलागुणाना वाव मिळावा तसेच त्यांना भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

येथील मुलींनी बनविलेल्या कलाकृती व हस्तकला साहित्याचे प्रदर्शन व विक्रीचे प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी सकाळी १० वाजता शुभारंभ होईल.

 जिल्हयात कोविड-१९ ने दोन्ही पालक मृत्यु पावलेल्या १० अनाथ बालकाना प्रत्येकी ५ लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण होणार आहे,
Previous Post Next Post
MahaClickNews