अमरावती,ब्युरो.
आपल्या वैविध्यपुर्ण आयोजनाकरिता ओळखल्या जाणार्या अंबानगरी फोटो, व्हिडीओग्राफर्स असोसिएशनने यंदा पुन्हा एकदा राज्यस्तरीय छायाचित्रकारांचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये बाजी मारण्याकरिता महाराष्ट्रातील छायाचित्रकारांचे चांगलेच कसब लागणार आहे.
अंबानगरी फोटो, व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशनची स्थापना 2007 मध्ये झाली. त्यानंतर 2013 रितसर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या संघटनेकडून रक्तदान शिबीर, वृषारोपन, अंधविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच फोटोग्राफर सन्मान कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, मात्र गेल्या दिड वर्षात कोरोना महामारीमुळे कार्यक्रम घेता आले नाही. मात्र यंदा राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कला नगरी म्हणून अमरावतीची ओळख आहे. अनेक कलाकार, कलावंतांचा जिल्हा आहे. ही कला जिवंत राहिली पाहिजे हाच उद्देश अंबानगरी फोटो व व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ मिळावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत असोसिएशनला महाराष्ट्रातील छायाचित्रकार यांची चांगली साथ मिळाली. तोच दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून यावर्षीसुध्दा भव्य राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता निखिल तिवारी (संपर्क 9921829585), अक्षय इंगोले (संपर्क 901150 7394), प्रतिक रोहनकर (संपर्क.9850334318) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.